महसूल अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करून तत्काळ शेतीचे पंचनामे करा - रावते  

परतीच्या पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे सर्वेक्षण करून त्यांना तातडीने 5 हजार रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे केली असून अमरावती महसूल विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सुट्या ताबडतोब रद्द करण्याचे आदेश शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज अमरावती येथे दिले.
महसूल अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करून तत्काळ शेतीचे पंचनामे करा - रावते  

अमरावती - परतीच्या पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे सर्वेक्षण करून त्यांना तातडीने 5 हजार रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे केली असून अमरावती महसूल विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सुट्या ताबडतोब रद्द करण्याचे आदेश शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज अमरावती येथे दिले. 

गेल्या 8 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱयांचा तोंडचा हाती आलेला घास हिरावून घेतला. या पावसात जिल्ह्यात सोयाबीन, पराटी, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी आज अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात एक बेठक घेतली या वेळी विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी हे सुटीवर गेले असल्याची माहिती त्यांना मिळाली असता रावते यांनी महसूल, कृषी विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सुट्या ताबडतोब रद्द करून त्यांना शेतकऱयांच्या नुकसानाचे पंचनामे करून त्यांना शासनाच्या वतीने पाच हजार रुपयांची मदत मिळण्याची मागणी आपण मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या आज झालेल्या बैठकीत केली असल्याची माहिती यावेळी रावते यांनी दिली.

या सोबतच शेतकऱ्यांनाची किमान 3 महिन्याचे वीज बिल माफ करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना वारंवार कागद पत्राची मागणी करू नये असे आदेश देखील त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com