आयुक्त सुनिल केंद्रेकर म्हणाले, मी घरचा डबा आणला आहे !

मराठवाड्याचे विभागीय महसूल आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी बुधवारी अचानक तहसिल कार्यालय व शाळेतील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
sunil_kendrekar
sunil_kendrekar

गेवराई (जि. बीड) : बडा अधिकारी दौऱ्यावर आल्यानंतर कामाचा ताण कमी पण इंतेजाम करता करता नाकी नऊ येतात. जेवण दुपारचे असो कि रात्रीचे चिकन - मटन  किंवा शाकाहारी महागडा सुकामेवा असा शाही बंदोबस्त करण्याचा रिवाज आहे .  गुरुवारी अचानक दौऱ्यावर आलेल्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या दुपारच्या भोजनाची अधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली. परंतु, मी, घरचा डबा आणला आहे, तुम्ही जेवून घ्या असे म्हणत वाहनात बसून त्यांनी औरंगाबादचा रस्ता धरला. 

मागच्या काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून सुनिल केंद्रेकर यांची कारकिर्द गाजली आणि बीडकरांच्या कायम स्मरणात राहील अशीच राहीली. विंधन विहिरीत पडलेल्या बालकाला वाचविण्यासाठी दोराला धरुन उतरणे असो कि एखाद्या ठिकाणी जाऊन सिंघम स्टाईल कारवाईमुळे ते लोकप्रियही होते. पण, त्यांचा कामाच्या खाक्यामुळे महसूलमधील कनिष्ठ कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडत असते. 

दरम्यान, गुरुवारी त्यांनी अचानक तहसिल कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी अचानक मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेकडे मोर्चा वळविला. मुख्याध्यापकाला विचारुन प्रयोगशाळा खोलीत जाऊन पाहतात तर काय सर्व उपकरणांवर बसलेली धुळ !

हे पाहून त्यांनी आपल्या शैलित प्रयोगशाळा सुधारा अशा सुचना दिल्या. त्यानंतर त्यांनी जाण्यासाठी निघाल्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर व तहसीलदार चव्हाण यांनी शासकीय विश्रामगृहात जेवायला चला म्हणून आग्रह धरला. परंतू केन्द्रेकर यांनी नकार देत ‘मी घरून डबा आणला आहे, तुम्ही जेवून घ्या’, असे सांगत औरंगाबादच्या दिशेने प्रयाण केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com