रावते म्हणाले , जयंतराव बैठक त्यांना स्वगृही परत आणण्यासाठी का ?

जयंत पाटील म्हणाले, योजना राबविण्यास अपयशी ठरलेल्या डॉ. अजित गवई यांची बदली करण्यात येईल. अकार्यकारी पदावर नियुक्ती करण्यात येईल
Ravte-Patil-Davkhare.
Ravte-Patil-Davkhare.

नागपूर :  राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करुन भाजपवासी झालेले आमदार निरंजन डावखरे हे रायगड जिल्ह्यातील आरोग्य विभागातील त्रुटीवर बोलत असताना बैठक घेऊन हा विषय मार्गी लावा असे मत अर्थमंत्री जयंत पाटील व्यक्त केले. 


सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जयंत पाटील म्हणाले, निरंजन सोबत खुप दिवस झाले बैठक झालेली नाही, बैठक घेऊन निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. दिवाकर रावते उभे झाले आणि म्हणाले, बैठक कश्‍याची स्वगृही वापस आणण्यासाठी की  प्रश्‍न सोडवण्यासाठी असा टोला हाणला.


रायगड जिल्ह्यातील आरोग्य सेवा योजना वेळेवेळी प्रयत्न करुन देखील शासन योग्यपद्धतीने त्याची अंमलबजावणी करीत नसल्याची लक्षवेधी सूचना अनिकेत तटकरे यांनी उपस्थित केली होती.

याबाबत जयंत पाटील म्हणाले, योजना राबविण्यास अपयशी ठरलेल्या डॉ. अजित गवई यांची बदली करण्यात येईल. अकार्यकारी पदावर नियुक्ती करण्यात येईल असे आश्‍वासन दिले. बैठकीबद्दल मात्र, पाटील यांनी बोलणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com