खातेवाटपाच्या चर्चेवरून बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल कॉंग्रेसमध्ये नाराजी

distress in congress as balasaheb thorat failed to get sufficient portfolios
distress in congress as balasaheb thorat failed to get sufficient portfolios

पुणे - शिवसेना आणि राष्ट्रवादीशी खातेवाटपाबद्दल  चर्चा करणाऱ्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली असून, महत्त्वाची खाती काँग्रेसला मिळवू न शकलेल्या थोरात यांच्यावर पक्षातील नेत्याची नाराजी आहे, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली.

शिवसेना आणि राष्ट्रवादीशी चर्चा करताना प्रदेशाध्यक्ष थोरात यांना काँग्रेसच्या पदरात फारसे काही पाडून घेता आले नसल्याची भावना काँग्रेसच्या वर्तुळात तयार झाली आहे. काँग्रेसमधील खातेवाटपाचा घोळ मिटत नसल्याने त्याच विषयावर पुन्हा चर्चा सुरू आहे.

काँग्रेसला ग्रामीण भागात मजबूत संघटन करायचे असेल तर ग्रामीण भागाशी आणि विशेषतः शेतकऱ्यांचा संबंध येणारी खाती मिळायला हवी होती. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. थोरात यांनी ठामपणे भूमिका घ्यायला हवी होती. पण त्यांनी ती घेतली नाही, असेही एका ज्येष्ठ नेत्याने `सरकारनामा'ला सांगितले.

अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना खातेवाटपाच्या चर्चेत स्थान नव्हते असेही सांगण्यात आले. मात्र "पक्षातील नाराजी लवकरच दूर होईल आणि दोन दिवसात काँग्रेसशी यादी फायनल होईल" असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com