गंगापूर - खुलताबाद मतदारसंघात चर्चा रंगतेय मंत्री पाहिजे की आमदार...

 गंगापूर - खुलताबाद मतदारसंघात चर्चा रंगतेय मंत्री पाहिजे की आमदार...

गंगापूर : गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी रंगात आली आहे. भाजप-शिवसेनेसह कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसनेदेखील प्रचारात आघाडी घेतली आहे. सोशल मीडियावर सध्या आता मंत्री पाहिजे की आमदार, असा प्रश्‍न मतदारांना विचारला जात आहे. महायुतीचे प्रशांत बंब व आघाडीचे संतोष माने 
यांच्यात थेट लढत आहे. 

सध्या भाजपा-शिवसेनाकडून सोशल मीडियावर मंत्री हवा की आमदार ? असा प्रश्‍न उपस्थितीत करून वेगळ्याच पध्दतीने प्रचार सुरू आहे. "प्रशांत बंब निवडून आले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठवाड्यातील सर्वात जवळचे आमदार म्हणून बंब यांना मंत्रिपद मिळणार असा दावा भाजप समर्थकांकडून केला जातोय. त्यामुळे विरोधी उमेदवाराला निवडून देत विरोधी बाकावर बसायचे? की मग मंत्रीपद घेऊन मतदारसंघाचा विकास करायचा अशा आशयाच्या पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

आघाडीचे उमेदवार संतोष माने यांचे वडील माजी आमदार अण्णासाहेब माने यांचा 2009 मध्ये पराभव करत आमदार प्रशांत बंब अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यांनतर गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपकडून दुसऱ्यांदा विजय मिळवत राजकारणात घट्ट पाय रोवले. विशेष म्हणजे गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदार संघात आजवरच्या इतिहासात सलग तिसरा विजय मिळवणे कुणालाही जमलेले नाही. प्रशांत बंब हा विक्रम आपल्या नावावर नोंदवणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे गेल्यावेळी तालुक्‍यातून बंब यांच्या विजयासाठी त्यांच्या सोबत असणारी आणि पडद्याआडून सूत्रे फिरवणारी मंडळी यंदा उघडपणे प्रचारात दिसत आहेत. रविवारी (ता.13) रोजी लासुर-स्टेशन येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. यानंतर तालुक्‍यातील वातावरण ढवळूण निघणार आहे. 

सध्या गावपातळीवरील कॉर्नर बैठकांतून दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. आमदार बंब यांनी मतदार संघासाठी मागील पाच वर्षात एक हजार कोटी रुपयांचा विकास निधी आणल्याचे बोलले जाते. आजवरच्या सर्वच लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीत हा सर्वाधिक निधी असल्याचा दावा केला जातोय 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com