अजितदादा, वळसे पाटील आणि हर्षवर्धन यांची एकास एक लढत

अजितदादा, वळसे पाटील आणि हर्षवर्धन यांची एकास एक लढत

पुणे : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत आपापल्या पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केलेल्या अनेकांनी सोमवारी (ता. 7) निवडणूक रिंगणातून माघार घेतली. यामुळे जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांत चुरशीच्या लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मंगलदास बांदल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्‍वर कटके, भाजपचे नगरसेवक किरण दगडे, अप्पासाहेब जगदाळे, आनंद थोरात, रामदास ठाकूर, अनिल राक्षे, नाथा शेवाळे, तुषार थोरात आदी विविध पक्षांच्या प्रमुख बंडखोरांनी माघार घेतली आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहापैकी इंदापूर, शिरूर, दौंड आणि खेड या चार विधानसभा मतदारसंघांत आजी-माजी आमदारांत थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय बारामती, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, भोर आणि मावळ या सहा मतदारसंघांत विद्यमान आमदारांविरुद्ध नवखा आणि तरुण चेहरा, अशी लढत होणार आहे. 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी अनुक्रमे शिरूर आणि इंदापूर तालुक्‍यातील भाजपच्या उमेदवाराला त्यांचा पाठिंबा जाहीर केला आहे. यानुसार कंद हे भाजपचे शिरूरचे उमेदवार बाबूराव पाचर्णे आणि जगदाळे हे माजी सहकारमंत्री आणि इंदापूरचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा प्रचार करणार आहेत. 

अशा रंगणार जिल्ह्यातील लढती 

बारामती- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस) विरुद्ध गोपीचंद पडळकर (भाजप), 

इंदापूर-आमदार दत्तात्रेय भरणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) विरुद्ध माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (भाजप),

शिरूर- बाबूराव पाचर्णे (भाजप) विरुद्ध माजी आमदार अशोक पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस),

दौंड आमदार राहुल कुल (भाजप) विरुद्ध माजी आमदार रमेश थोरात (राष्ट्रवादी कॉंग्रेस),

आंबेगाव- आमदार दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) विरुद्ध राजाराम बाणखेले (शिवसेना)

पुरंदर- जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे (शिवसेना) विरुद्ध कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप,

भोर- आमदार संग्राम थोपटे (कॉंग्रेस) विरुद्ध कुलदीप कोंडे (शिवसेना),

मावळ- कामगार राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे (भाजप) विरुद्ध सुनील शेळके (राष्ट्रवादी कॉंग्रेस),

खेड- आमदार सुरेश गोरे (शिवसेना) विरुद्ध माजी आमदार दिलीप मोहिते (राष्ट्रवादी कॉंग्रेस) विरुद्ध अतुल देशमुख (अपक्ष)

जुन्नर- शरद सोनवणे (शिवसेना) विरुद्ध अतुल बेनके (राष्ट्रवादी कॉंग्रेस) विरुद्ध आशा बुचके (अपक्ष)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com