dinner diplomacy of congress leaders with sharad pawar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

चंद्रपूर जिल्ह्यात भाजप ला धक्का..सुधीर मुनगंटीवार वगळता भाजप चे सर्व उमेदवार पिछाडीवर...
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
नितेश राणे यांना 8483 मतांची आघाडी पाचवी मतमोजणी फेरी पूर्ण
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अँड गौतम चाबुकस्वार हे मतदानाच्या पहिल्या फेरीत २,६६९ मतांनी आघाडीवर.
सिल्लोड : पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना 2167 मतांची आघाडी
पहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री 2,560 मतांनी आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

शरद पवारांनी रात्रीचे भोजन घेतानाच अनेक किल्ल्या फिरविल्या!

चेतन देशमुख
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तब्बल 15 तास यवतमाळात होते. नियोजित दौऱ्यात यवतमाळ नसतानाही पवार यांच्यासारख्या नेत्यांचा मुक्काम म्हटल्यावर अनेकांच्या नजरा यवतमाळकडे वळल्या.

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तब्बल 15 तास यवतमाळात होते. नियोजित दौऱ्यात यवतमाळ नसतानाही पवार यांच्यासारख्या नेत्यांचा मुक्काम म्हटल्यावर अनेकांच्या नजरा यवतमाळकडे वळल्या.

कॉंग्रेस व मित्रपक्षातील नेत्यांनी माजी आमदार संदीप बाजोरीया यांच्याकडे रात्री उशिरा पवार यांची भेट घेतली. याबाबतचा तपशील गुलदस्त्यात असल्याने "डिनर डिप्लोमसी'मध्ये काय शिजले, हे कळू शकले नाही. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांची आघाडी असली तरी अनेक भागांत दोन्ही पक्षांतील नेत्यांचे मनोमीलन झालेले दिसत नाही. तशीच स्थिती जिल्ह्यातही आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला जिल्ह्यात महत्त्व दिले जात नसल्याची तक्रार राष्ट्रवादीची आहे. त्यामुळेच विरोधी भूमिका घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा राहिला आहे. तसे उघडपणे कार्यकर्त्यांनी सांगितले होते. त्यामुळेच पवारांच्या या भेटीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. या भेटीत पवार याबाबत काय भूमिका घेतात, यावर विविध चर्चांना उधाण आले होते. रात्री नऊच्या दरम्यान शरद पवार यांचे संदीप बाजोरिया यांच्या निवासस्थानी आगमन झाले. त्यानंतर विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, कॉंग्रेसचे यवतमाळचे उमेदवार बाळासाहेब मांगूळकर, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेत.

पवार यांनी यावेळी कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत जेवण घेतले. यावेळी झालेल्या "डिनर डिप्लोमसी'मध्ये जिल्ह्यातील राजकीय समीकरण व इतर अनेक महत्त्वांच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे बाहेर आले नाहीत. यानंतरही जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी श्री. पवार यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यात युतीमधील नेत्यांच्या नावांचाही समावेश आहे. त्यामुळे यवतमाळच्या राजकीय क्षेत्राला पवार कोणता धक्का देतात, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

बाजोरियांकडे युतीच्या नेत्यांच्या भेटी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता. नऊ) रात्री व गुरुवारी (ता.10) सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप बाजोरिया यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यामुळे कॉंग्रेस व मित्रपक्षांतील नेत्यांचा मोर्चा या ठिकाणाकडे वळला होता. सोबतच युतीच्या एका उमेदवार नेत्यांची पाऊले देखील बाजोरियांच्या निवासस्थानाकडे वळल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे रंगतदार होण्याची चर्चा सुरू आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख