भाजपच्या आमदार सीमा हिरेंना महापालिका गटनेते दिनकर पाटीलांचे आव्हान?

विधानसभा निवडणूकीची घोषणा होण्याआधीच भारतीय जनता पक्षात इच्छुकांनी हाकारे देण्यास सुरवात केली आहे. विविध कारणांनी सतत चर्चेत महापालिकेतील भाजप गटनेते दिनकर पाटील यांनी नाशिक पश्‍चिम मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला आव्हान दिले आहे. त्यासाठी त्यांनी नऊशे व्यावसायिकांच्या सहीचे पत्रक वितरीत करीत लोकसंपर्क सुरु केला. त्यामुळे निवडणूकीआधीच आमदार हिरे व पाटील यांच्यातील राजकीय वादाला तोंड फुटण्याच्या शक्‍यतेने भाजपमध्ये खदखद सुरु झाली आहे.
भाजपच्या आमदार सीमा हिरेंना महापालिका गटनेते दिनकर पाटीलांचे आव्हान?

नाशिक : विधानसभा निवडणूकीची घोषणा होण्याआधीच भारतीय जनता पक्षात इच्छुकांनी हाकारे देण्यास सुरवात केली आहे. विविध कारणांनी सतत चर्चेत महापालिकेतील भाजप गटनेते दिनकर पाटील यांनी नाशिक पश्‍चिम मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला आव्हान दिले आहे. त्यासाठी त्यांनी नऊशे व्यावसायिकांच्या सहीचे पत्रक वितरीत करीत लोकसंपर्क सुरु केला. त्यामुळे निवडणूकीआधीच आमदार हिरे व पाटील यांच्यातील राजकीय वादाला तोंड फुटण्याच्या शक्‍यतेने भाजपमध्ये खदखद सुरु झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता इच्छुकांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. काहींनी प्रचाराला सुरवात करण्यात आली आहे. पश्‍चिम मतदारसंघात दिनकर पाटील यांना विधानसभेत पाठविण्यासाठी डॉक्‍टर, वकील व व्यावसायिकांकडून पत्रकबाजी सुरू झाली आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी श्री. पाटील यांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे आमदार हिरे यांनी विकास केला नाही असा संदेश देण्याचाही हा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपच्या इतर इच्छुकांच्या पोटात गोळा उठला आहे. शिवसेनेकडून या मतदारसंघाची मागणी होत असल्याने शिवसेनेच्या इच्छेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न पाटील समर्थकांकडून सुरू झाले आहेत. 

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, त्यात भाजप-शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळाले. सहा विधानसभा मतदारसंघांत युतीच्या मतांचा टक्का वाढल्याने विधानसभा निवडणुकीतदेखील मतदारांचा कौल युतीच्याच बाजूने असल्याचा अंदाज लावत इच्छुकांकडून तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होईल की नाही याबाबत साशंकता होती. त्यामुळे दिनकर पाटील यांनी सातपूर व सिडको भागात वीस हजारांहून अधिक पत्रके वाटत उमेदवारीवर दावा केला होता; परंतु युतीच्या जागावाटपात शिवसेनेला जागा सुटल्याने पाटील यांनी माघार घेत शिवसेनेच्या उमेदवारासाठी मतदारसंघ पिंजून काढला होता. लोकसभेत अपेक्षाभंग झाल्यानंतर पाटील यांना पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचे वेध लागले आहेत. पाटील यांच्या इच्छेला डॉक्‍टर, वकील, व्यावसायिकांची साथ मिळत असून, सातपूर-सिडको विभागात पत्रकांच्या माध्यमातून पाटील यांचा प्रचार सुरू झाला आहे. 'सबका साथ सबका विकास' करण्यासाठी पाटील यांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन पत्रकांच्या माध्यमातून केले जात आहे. पत्रकावर 900 संघटनांच्या प्रतिनिधींची नावे आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com