आमदार सीमा हिरेंना घरचा आहेर, दिनकर पाटील म्हणाले....कामे केव्हा करणार?

भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी स्वपक्षाच्या आमदार सीमा हिरे यांना पत्र लिहून निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची आठवण करुन दिली आ
BJP Leader Dinkar Patil Writes Letter to Seema Hiray and MP Hemant Godse
BJP Leader Dinkar Patil Writes Letter to Seema Hiray and MP Hemant Godse

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी स्वपक्षाच्या आमदार सीमा हिरे यांना पत्र लिहून निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची आठवण करुन दिली आहे. औद्योगिक वसाहतीतील प्रश्‍न केव्हा सोडवणार? असा प्रश्‍न केल्याने भाजप आमदार हिरेंना स्वपक्षाकडूनच घरचा आहेर मिळाला आहे. पाटील व हिरे यांच्यात गेली काही वर्षे सातत्याने राजकीय वर्चस्व वादातून वाद आहे.

नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, पश्‍चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांना पत्र लिहून औद्योगिक वसाहतीमधील समस्यांचा पाढा वाचला. दिनकर पाटील यांचा हा घरचा आहेर आहे, की निवडणुकीत उद्योजकांना दिलेल्या आश्‍वासनांची आठवण करून देण्याचा भाग आहे, याबद्दल भाजप व शिवसेनेत खुमासदार चर्चा सुरू आहे. अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींशी कायम पत्रव्यवहार करून प्रत्येक गोष्ट कागदावर आणणारे नगरसेवक दिनकर पाटील यांनी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे व पश्‍चिम मतदारसंघातील आमदार सीमा हिरे यांना औद्योगिक वसाहतींमधील समस्या सादर केल्या आहेत. 

गोडसे व हिरे यांनी अनुक्रमे लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी औद्योगिक समस्या सोडविण्याबरोबरच उद्योग आणण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याअनुषंगाने पाटील यांच्या पत्राला महत्त्व आले असून, पाटील यांचा घरचा आहेर समजला जात आहे. गोडसे व हिरे या दोघांच्या मतदारसंघात औद्योगिक वसाहत असून, येथे मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत आहेत. सातपूर, अंबड, माळेगाव, मुसळगाव, इगतपुरी व गोंदे या औद्योगिक वसाहतीत कारखाने बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, कारखाने सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती पाटील यांच्याकडून करण्यात आली. 

सध्या ज्या कंपन्या सुरू आहेत तेथे कामगारांची पिळवणूक सुरू आहे. कामगारांना किमान वेतन व इतर सुविधा मिळत नाहीत. अनेक कंपन्यामध्ये सात-आठ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. अंबडमधील ऑटो कॉर्प हे त्यातीलच एक उदाहरण. कामगार संघटनाही व्यवस्थापनाशी तडजोडी करीत असल्याने कामगारांना न्याय मिळत नाही. या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कंपनी मालकांची बाजू न घेता प्रयत्न करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. आपण दोघांनाही जनतेने फार अपेक्षेने निवडून दिले असल्याने कामगारांना न्याय देण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com