मला अनेकांनी उमेदवारी कायम ठेवण्यासाठी प्रलोभन दाखवले पण ... : माने 

..
mane bhalerao
mane bhalerao

औसाः औसा मतदारसंघात गेली वीस पंचेवीस वर्ष सक्रीय राजकारणात असलेले शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने हे या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी खंबीरपण उभे आहेत. त्यामुळे मानेंच्या साथीने अभिमन्यू निवडणुकीचे चक्रव्यूह भेदणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

औसा हा मतदारसंघ शिवसेनेचा. यात शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांच्या रुपाने मतदारसंघाला नेतृत्व मिळाले. दिनकर  माने यांनी 99 मध्ये 41 हजार मते घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किशनराव जाधव यांचा पराभव केला होता.

तर 2004 मध्येही 71 हजार मते घेत माने विजयी झाले होते. 2009 आणि 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी लक्षणीय मते घेतली होती. त्यामुळे माने यांच्या रुपाने मतदारसंघावरशिवसेनेचे वर्चस्व राहिले.

2019 च्या निवडणुकीतही माने यांनी तयारी सुरु केली होती. पण युतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपला मिळाली. गेल्या काही महिन्यापासून पवार यांनी विकास कामे करीत मतदारसंघावर दावा केला होता.

अखेर पक्षानेही त्यांना उमेदवारी जाहिर केली. त्यानंतर सुरवातीला माने नाराज झाले. अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांनी माघार घेतली.

त्यानंतर माने यांनी पवार यांच्या विजयासाठी स्वःताला झोकून दिले. मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पवार यांना सोबत घेवून त्यांनी आता प्रचाराला सुरवात केली आहे. गावागावात बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सक्रीय केले. माने यांचा निवडणुक लढवण्याचा अनुभव देखील पवार यांच्यासाठी फायद्याचा ठरत आहे.

मला अनेकांनी उमेदवारी कायम ठेवण्यासाठी प्रलोभन दिली. परंतु  त्यांचा डाव ओळखला. मी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आमदार झालो. महाराष्ट्राच्या विधानभवनावर भगवा फडकवण्याचे त्यांचे स्वप्न होते.

ते पुर्ण करण्यासाठी मी माघार घेऊन युतीधर्म पाळल्याने माने सांगतात. औसा तालुक्‍यातील विकासाची गती वाढविण्यासाठी पवार यांना मतदान करुन केंद्र व राज्याच्या विकासाचे वाटेकरी व्हावे असे आवाहनही माने प्रचारातून करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com