भाजपच्या भारती पवारांच्या निवडणुकीत शिवसेनेचीच सत्वपरिक्षा

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात युतीतर्फे भाजपच्या डॉ. भारती पवार निवडणूक लढवित आहेत. मात्र, या मतदारसंघात विधानसभेसाठीचे बहुतांश मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रचारात भाजपचे मोजके कार्यकर्ते सक्रीय दिसतात. मात्र विधानसभेत दगाफटका नको म्हणुन शिवसेना नेत्यांचीच प्रचारात धावपळ सुरु आहे. या मतदारसंघ मिळणारी आघाडी एका दृष्टीने शिवसेनेचे सत्वपरिक्षा बनली आहे.
भाजपच्या भारती पवारांच्या निवडणुकीत शिवसेनेचीच सत्वपरिक्षा

दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात युतीतर्फे भाजपच्या डॉ. भारती पवार निवडणूक लढवित आहेत. मात्र, या मतदारसंघात विधानसभेसाठीचे बहुतांश मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रचारात भाजपचे मोजके कार्यकर्ते सक्रीय दिसतात. मात्र विधानसभेत दगाफटका नको म्हणुन शिवसेना नेत्यांचीच प्रचारात धावपळ सुरु आहे. या मतदारसंघ मिळणारी आघाडी एका दृष्टीने शिवसेनेचे सत्वपरिक्षा बनली आहे.

दिंडोरी मतदारसंघ हा कांदा, द्राक्ष, डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर आहे. गेल्या दोन वर्षात येथील शेतकऱ्यांना कांदा व द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. या दोन्हींचे दर शेअर बाजारासारखे केव्हाही कोसळतात किंवा चढतात. मात्र, यंदा भाव एव्हढे कोसळले की प्रत्येक शेतकरी उध्वस्त झाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच द्राक्षांचे भाव एकदम कमी झाल्याने काही शेतकऱ्यांनी द्राक्षबागा तोडल्या. त्याची नाराजी केंद्र व राज्यातील सरकारवार वारंवार व्यक्त होतेय. अशा स्थितीत भाजप सावधपणे पावले टाकत आहे. ऐनवेळी त्यांनी विद्यमान खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांची उमेदवारी बदलली. पुर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. पवार यांना उमेदवारी दिली. मात्र, सुरगाणा, पेठ येथील भाजपचे कार्यकर्ते प्रचारात आलेले नाही. त्यामुळे उमेदवार पवार यांना आपला सुरगाणा, पेठचा दौरा पुढे ढकलावा लागला. देवळा, चादंवड वगळता अन्यत्र भाजप सक्रीय नाही.

सहा विधानसभा मतदारसंघांतील येवला, दिंडोरी, नांदगाव, निफाड हे चारही विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. यातील निफाड मतदारसंघात अनिल कदम शिवसेनेचे आमदार आहेत. आमदार कदम आणि भाजपचे आमदार डॉ. राहूल आहेर यांचा भाजपचा उमेदवार बदलण्यात महत्वाची भूमिका होती. सध्या हे दोन्ही आमदार लोकसभा प्रचारात सक्रीय आहेत. येवल्यातुन संभाजी पवार, नांदगावमधुन सुहास कांदे यांचे समर्थक, दिंडोरीत रामदास चारोस्कर यांनी भाजपच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे. डॉ. पवार यांना मतांची आघाडी मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. विशेषतः माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात संभाजी पवार यांनी सबंध तालुक्‍यात यंत्रणा उभी केली आहे. त्यांनी विधानसभेसाठी लोकसभेची निवडणुकीत प्रतिष्ठेची केली आहे. याउलट अद्याप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नेते अद्याप प्रचारात सक्रीय झालेले दिसत नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात उमेदवार भाजपचा आहे. मात्र प्रचारात सत्वपरिक्षा शिवसेनेची आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com