पिचड एकनिष्ठ, ते कसे राष्ट्रवादी सोडतील?

आज मुलाखती दिलेल्या इच्छुकांचे म्हणणे ऐकूण घेतले असून, पक्ष लवकरच याबाबत निर्णय देणार आहे.
पिचड एकनिष्ठ, ते कसे राष्ट्रवादी सोडतील?

नगर : कोणी कोणाची भेट घेतील म्हणून पक्ष सोडला, असा अर्थ होत नाही. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड हे पक्षाशी एकनिष्ठ आहेत. ते पक्षाचे यापुढेही काम करतील. त्यांची तब्येत बरी नसल्याने ते आज येवू शकले नाहीत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नगरचे प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी केले.

पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी ते आज नगरला आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते जाणून घेत आहोत. मित्रपक्षांशी आघाडी होणार आहे. जागा वाटपाबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीत चर्चा सुरू आहे. आघाडीत पारंपारिक जागेबाबत दोन्ही पक्षात चर्चा सुरू आहे. ज्या ठिकाणी विद्यामान आमदार आहेत, तेथे मात्र संबंधित आमदारांसाठी त्या-त्या पक्षाला जागा सोडली जाईल.

नगरमध्ये आज होत असलेल्या मुलाखतीत आमदार संग्राम जगताप मुंबईला असल्याने येऊ शकले नाहीत, मात्र आमदार अरुण जगताप येवून गेले. त्यांनी संग्राम यांना उमेदवारी देण्याबाबत मागणी केली आहे. आज मुलाखती दिलेल्या इच्छुकांचे म्हणणे ऐकूण घेतले असून, पक्ष लवकरच याबाबत निर्णय देणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com