Dilip Valse patil doesn't rule out joining government | Sarkarnama

आम्ही सत्ताधारी की विरोधी बाकावर बसणार, हे आता सांगता येत नाही: वळसे पाटील 

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

विधानसभेत आम्ही सत्ताधारी कि विरोधी बाकावर बसणार. हे आता सांगता येणार नाही. यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस ताकदीने लढणार आहे. - दिलीप वळसे पाटील

मंचर  :  "पैश्याच्या जोरावर विधानसभा निवडणूक जिंकली. याचा अर्थ मतदारांना विकत घेतले. असा होतो. हा विरोधाकांचा आरोप मतदारांचा अपमान करणारा दुर्दैवी व दुखदायक आहे. विरोधक बोलताना तारतम्य ठेवत नाहीत. विधानसभेत आम्ही सत्ताधारी कि विरोधी बाकावर बसणार. हे आता सांगता येणार नाही. यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस ताकदीने लढणार आहे,'' असे आमदार दिलीप वळसे पाटील येथे म्हणाले .  

दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे मंत्रिपद भूषविलेलं आहे. ते विधानसभेचे अध्यक्षही राहिलेले आहेत . राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांत त्यांचा समावेश होतो . आजच्या भाषणात त्यांनी विधानसभेतील कोणत्या बाकावर राष्ट्रवादी बसणार हे अद्याप सांगता येणार नाही असे केलेले विधान सूचक मानले जात आहे.  

     मंचर (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी निवडून आलेल्या आमदारांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी श्री वळसे बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे ,  मोहिते, बेनके, तुपे, प्रदीप गारटकर, देवेंद्र शहा, विवेक वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, उषा कानडे, अरुणा थोरात, विष्णू हिंगे, राजू इनामदार, प्रभाकर बांगर, रामदास किसनराव बाणखेले, युवराज बाणखेले, सुभाष मोरमारे उपस्थित होते.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यावेळी बोलताना म्हणाले , "शिरूर लोकसभा मतदार संघात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, अशोक पवार, अतुल बेनके, चेतन तुपे या पाच पांडवांची ताकद आमदार पदाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उभी केली आहे. त्यामुळे या भागातील सर्वच प्रश्नांना न्याय देण्याचे काम एकत्रितपणे केले जाईल. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्हा भगवामय करू. अशी वल्गना लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेनेच्या उपनेत्यानी केली होती. पण जिल्हा च शिवसेनामुक्त झाला आहे. याचे आत्मचिंतन त्यांनी जरूर करावे. नुसत्या टीका करण्याचे उद्योग थांबवावेत. " 
   
    "दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील सर्व आमदार एकत्रितपणे काम करून पाणी प्रश्नासह सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका पार पडतील.'' असे मोहिते यांनी सांगितले.

    जेष्ठ नेते शरद पवार यांचे आशीर्वाद डॉ. अमोल कोल्हे व दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूक प्रचारात आखलेली रणनीती राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मला मिळालेल्या संधीचे सोने करील. असे बेनके यांनी सांगितले.

    हडपसर मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची भक्कम बांधणी करण्याचे काम सुरु आहे. कार्यक्षम तरुणांना संधी दिली जाईल. असे तुपे यांनी सांगितले.

   देवदत्त निकम, पोपटराव गावडे, सुहास बाणखेले यांची भाषणे झाली. बाळसाहेब बाणखेले यांनी आभार मानले. निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले.    

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख