dilip patil gets chanakya niti from deshmukh | Sarkarnama

दिलीप पाटलांना संग्रामसिंह देशमुखांकडून `चाणक्य नीती`

संपत मोरे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या कारभारावर नाराज होऊन संचालकांनी राजीनामे दिले आहेत. योगायोग असा की त्याच दरम्यान पाटील यांचा वाढदिवस आला. त्यांच्या वाढदिवसाला त्यांना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, नानासाहेब महाडीक यांनी खास भेटून शुभेच्छा दिल्या.

या शुभेच्छांची चर्चा सुरु असतानाच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिलीपतात्याना 'चाणक्यनीती 'पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या. देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत. दिलीप पाटील आणि संग्रामसिंह देशमुख यांची मैत्री सर्वांना माहिती आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देशमुख भाजपकडून रिंगणात होते पण त्यांचा प्रचार करायला दिलीप पाटील गेलेले. तेव्हा ते म्हणाले होते,"संग्रामसिंह देशमुख यांच्यासाठी मी तालुक्याच्या आणि पक्षाच्या सीमा ओलांडून आलोय. प्रेम कराव ते संग्रामनेच आणि दोस्ती करावी संग्रामनेच.त्यांच्यासारख्या गुणी माणसासाठी मी इथं आलोय आणि येणार" या वाक्याची तेव्हा सांगलीच्या राजकारणात खूपच चर्चा झाली होती.

आता वाढदिवसाला संग्रामसिंह देशमुख चाणक्य नीती घेऊन आल्याने खूपच चर्चा सुरु झाली आहे. यावर देशमुख म्हणातात की  तात्या माझे मार्गदर्शक आहेत. आम्ही दोघे बँकेत एकत्र काम करतोय.त्याना शुभेच्छा देण्यात सहजता आहे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख