माजी आमदार दिलीप मोहिते यांना तूर्तास अटकेपासून संरक्षण

माजी आमदार दिलीप मोहिते यांना तूर्तास अटकेपासून संरक्षण

राजगुरूनगर  : चाकणमध्ये जुलै २०१८ मध्ये झालेल्या, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचारप्रकरणात संशयित आरोपी करण्यात आलेले, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा मुंबई येथील उच्च न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन आज मंजूर झाला आहे. त्यांना 21 आॅगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.

 मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी, चाकण येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी, दिलीप मोहिते-पाटील यांना संशयित आरोपी करण्यात आल्यानंतर, त्यांनी खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी दाखल केलेला अर्ज फेेटाळण्यात आला होता.

त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती ढेरे यांच्यासमोर सुनावणी झाली. मोहिते यांच्या बाजूने त्यांचे वकील ऍड. मनोज मोहिते व तपन थत्ते यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर 
न्यायाधीशांनी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आणि पुढील सुनावणी २१ ऑगस्ट रोजी ठेवल्याची माहिती मोहिते यांच्या निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान त्यांना १ ऑगस्ट रोजी चाकण पोलीस ठाण्यात जबाब देण्यास सांगण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com