कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहून दिलीप मानेंना काहीच मिळाले नाही!

तुम्हाला योग्य न्याय देता येईल अशा पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेईल
कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहून दिलीप मानेंना काहीच मिळाले नाही!
कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहून दिलीप मानेंना काहीच मिळाले नाही!

सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांनी 'शिवबंधना'त अडकण्याचे संकेत दिल्याने कॉंग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. येत्या शनिवारी (ता.24) ते कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री. माने यांनी कॉंग्रेस सोडणार असल्याचे स्पष्ट केले. ब्रम्हदेवदादा माने बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीस उत्तर सोलापूर तालुक्‍यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

उत्तर सोलापूर पंचायत समितीचे सदस्य हरीदास शिंदे, बाजार समितीचे संचालक नामदेव गवळी, माने बॅंकेचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, संचालक पांडुरंग चवरे, माजी नगरसेवक दत्तात्रय ताकमोगे, रेवणसिद्ध साखरे आदी उपस्थित होते. 

दिलीप माने हाच आमचा पक्ष आहे. कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहूनही म्हणावे तसे मानपान आणि संधी मिळाली. वेळोवेळी डावलण्यात आले. त्यामुळे आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तुम्ही कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. कोणत्याही पक्षात जा, मात्र निवडणूक लढवाच असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी केला.  

कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्यानंतर श्री. माने म्हणाले,"तुमच्या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन आणि तुम्हाला योग्य न्याय देता येईल अशा पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेईल. तुम्हाला विश्‍वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहूनही काहीच मिळाले नाही, त्यामुळे कॉंग्रेसमध्ये आता थांबणे शक्‍य नाही, लवकरच निर्णय घेण्यात येईल.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com