mane-ss
mane-ss

महिलांच्या हाताला रोजगार देऊ  : दिलीप माने 

..

सोलापूर  : महिलांच्या हाताला रोजगार देण्यासाठी उद्योग उभारा. आर्थिक सहकार्य करण्याबरोबर जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्‍वासन शहर मध्यचे महायुतीचे उमेदवार दिलीप माने यांनी दिले. लक्ष्मी-विष्णू चाळीतील जाहीर सभेत ते बोलत होते. या जाहीर सभेला भर पावसात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. 

यावेळी सेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर, अशोक भोसले, राजू डोंगरे, चंद्रकांत धुमाळ, चंद्रकांत मेकाले, लहू गायकवाड, वजीर शेख, विठ्ठल वानकर, ज्योतिबा चांगभले, अरुण जाधव, राजू शेख, मारुती शिंदे, लक्ष्मी बंडगर, राणी सरवदे, संगीता हरवाळकर, गीता डुकरे, चौगुले ताई यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शहर मध्यमधील अपक्ष उमेदवार मनीष गायकवाड यांनी सभेत शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांना पाठिंबा दिला. शहर मध्यच्या विकासासाठी आपण जाहीर पाठिंबा दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 

उमेदवार माने म्हणाले, "मध्य मतदारसंघात कामगारांची संख्या मोठी आहे. मात्र, रोजगार नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. उद्योग उभारण्याबरोबरच उद्योग वाढीला चालना देऊन महिलांच्या हाताला काम देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. पापड उद्योगाबरोबर अन्य वेगवेगळे उद्योग उभारा माने बॅंकेतर्फे सर्वतोपरी मदत करू.'' 

प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक तथा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर म्हणाले, या भागात ड्रेनेजची मोठी समस्या आहे. ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी मोठ्या निधीची आवश्‍यकता आहे. त्यासाठी आपणास आमदार करण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू. महापालिका निवडणुकीत जसे या भागातून मला सर्वाधिक मताधिक्‍य मिळाले तितकेच मताधिक्‍य दिलीप माने यांना देण्याचे आवाहनही जिल्हाप्रमुख वानकर यांनी केले. या भागातून भरघोस मतांनी माने यांना निवडून देऊ, असे राजू डोंगरे म्हणाले. 

युवा सेनेचा होम टू होम प्रचार 

महायुतीचे उमेदवार दिलीप माने यांच्या प्रचारार्थ साठे देशमुखवस्ती, विनायकनगर शिवशक्ती शिक्षण व क्रीडा सांस्कृतिक मंडळ, अंत्रोळीकरनगर, सुनीलनगर न्यू स्टार मित्रमंडळ आदी ठिकाणी बैठका झाल्या. यावेळी जिल्हाप्रमुख गणेश वानकर, संदीप हंचाटे, विजय लुंगसे, गणेश राऊत, गोविंद मसाळ, सारंग ढावरे, अमित जाधव, कुमार कोकाटे आदी उपस्थित होते. युवा सेनेने माने यांचा होम टू होम प्रचार केला. युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या नेतृत्वाखाली फलमारी चौक, दत्तनगर, विनायकनगर, न्यू सुनीलनगर आदी परिसरात प्रचार करण्यात आला. यावेळी अमर बोडा, सुमीत साळुंखे, प्रल्हाद शिंदे, रवी कोकुल, गुरुनाथ शिंदे, योगेश भोसले आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com