घुले- राजळेंनी सर्व पदे घरात घेतली आणि कार्यकर्त्यांना संपविले  : लांडे

Rajale_Ghule
Rajale_Ghule

शेवगाव (नगर) : सर्व पदे घरात घेण्यासाठी सच्चा कार्यकर्त्यांना निवडणूकीतच संपविल्याने संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मतदारसंघात राबविण्याची वेळ घुले बंधू आणि आमदार  राजळेंवर आली आहे. आमच्यासारख्यांच्या कष्टावर आमदार झालेल्यांनी आता भांडणे लावण्याचे उद्योग बंद करावेत. आम्ही सर्व खोडील कार्यरर्ते आता एकाजागी आलो आहोत. त्यामुळे आता कोणाचीच खोड मोडणे अशक्य नाही, असा इशारा जेष्ठ नेते दिलीप लांडे यांनी दिला.

बोधेगाव (ता. शेवगाव) येथे माजी जिल्हा परीषद सदस्य नितीन काकडे यांनी वाढदिवसानिमीत्त विधानसभेच्या तयारीसाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ नेते लांडे बोलत होते. अध्यक्षस्थानी नितीन काकडे होते. 

 यावेळी लांडे म्हणाले की, कष्ट आम्ही घ्यायचे  आणि पदे तुम्ही घ्यायची. आम्ही भगवे कपडे घालून हिमालयात जाण्यासाठी राजकारणात आलेलो नाहीत. मतदारसंघातील प्रस्थापित दोन्ही-तिन्ही घराण्यांचा सत्ता आणि पैशाचा उन्माद या निवडणुकीत संपवून दाखवू. मोठ्या इच्छाशक्ती अभावी मुळा धरणाचे पाणी टेलला मिळत नाही. 

पूर्व भागाला वरदान ठरलेला ताजनापूर उपसा सिंचन प्रकल्प, जायकवाडी समांतर कालवा हे महत्त्वाच्या प्रश्न सोडविण्यात कोणालाही स्वारस्य नाही. तालुक्यात हप्तेखाऊ राजकारण वाढल्याने प्रत्येक कार्यालयात गोरगरीबांची कामे होत नाहीत. आमच्यापैकी एकाला विधानसभेची उमेदवारी दया, अन्यथा आम्हाला ग्रुहीत धरू नका, असे आम्ही मंत्री पंकजा मुंडे आणि पक्षश्रेष्ठींकडे करणार आहोत.

 नितीन काकडे म्हणाले की, आपण आतापर्यंत प्रत्येकाला मदत करत आलो. तालुक्यासाठी व राजळेंसाठी भावकीचा वाद वाढवून घेतला. पण त्याचे फळ आम्हाला चांगले मिळाले नाही. सत्तेत असुनही कार्यकर्त्यांना विविध शासकीय कमिट्यांवर बसवता आले नाही. उलट प्रशासनासमोर आमची गुन्हेगार म्हणून प्रतिमा रंगवून आम्हाला विविध ठिकाणी अडकविण्याचे उद्योग सुरु केले. आपण पूर्व भागात कधीही वाद पेटवून उद्योग केले नाहीत.

शेजारच्या गेवराई तालुक्याला जायकवाडीचे पाणी मिळते, पण इथे प्यायला पाणी नाही. आम्ही भाजपसाठी खस्ता खाल्लेले मुळ कार्यकर्ते आहोत. आम्हाला राजकारणात पद असो किंवा नसो काही फरक पडत नाही. लोकांना आमदार करणाऱ्या आम्हाला तुम्हाला घरी बसवायला वेळ लागणार नाही. आता आमचा आपसातील वाद मिटवून आमच्यापैकी एकाला तालुक्याचा आमदार केल्याशिवाय शांत बसणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com