dilip khaire and tupe hope market committee | Sarkarnama

चंद्रकांत पाटील पालकमंत्री झाल्याने खैरे आणि तुपेंना बाजार समितीचे वेध!

गणेश कोरे
बुधवार, 12 जून 2019

पुणे : जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाल्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळ नियुक्तीच्या हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. मंडळावर वर्णी लागण्यासाठी जुन्या मंडळातील सदस्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मागील प्रशासकीय मंडळावरील काही ‘चर्चेतील'' सदस्यांमुळे मंडळाचे कामकाज विशेष गाजले होते. यामुळे आता नवीन नियुक्त्या करताना ताकही फुंकून प्यावे लागणार असून, पाटील यांच्या पालकमंत्रिपदी नियुक्तीमुळे दिलीप खैरे आणि भूषण तुपे यांची नावे निश्‍चित समजली जात आहेत.

पुणे : जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाल्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळ नियुक्तीच्या हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. मंडळावर वर्णी लागण्यासाठी जुन्या मंडळातील सदस्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मागील प्रशासकीय मंडळावरील काही ‘चर्चेतील'' सदस्यांमुळे मंडळाचे कामकाज विशेष गाजले होते. यामुळे आता नवीन नियुक्त्या करताना ताकही फुंकून प्यावे लागणार असून, पाटील यांच्या पालकमंत्रिपदी नियुक्तीमुळे दिलीप खैरे आणि भूषण तुपे यांची नावे निश्‍चित समजली जात आहेत.

राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये पुणे बाजार समितीचा समावेश आहे. या बाजार समितीवर गेली १४ वर्षे प्रशासक आहेत. गेल्या काही वर्षांत आघाडी सरकारने राष्ट्रवादी काॅँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांच्या अध्यक्षतेखाली २२ जणांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली. मात्र, महायुतीचे सरकार आल्यावर या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती रद्द करत, सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ टिळे यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली. या मंडळावरील अनेक सदस्यांना बाजार समिती कामकाजाचा अनुभव नसल्याने विशेष काम करू शकले नाहीत.

यानंतर टिळे यांच्याकडील अध्यक्षपदाची धुरा बारामतीचे कार्यकर्ते आणि भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिलीप खैरे यांच्याकडे देण्यात आली होती. खैरे यांनी विविध घटकांना सामावून घेत, विकासकामे सुरू केली. यामध्ये धर्तीवरील आंतरराष्ट्रीय फूल बाजाराची उभारणी, संपूर्ण बाजार आवराचा पुनर्विकासाचे नियोजन, बाजार आवारातील रस्त्यांचे डांबरीकरण आदी कामांचा समावेश होता. दरम्यानच्या काळात सहकार आणि पणन मंत्रालयाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडून सुभाष देशमुख यांच्याकडे आली. यानंतर बाजार समितीच्या सचिवपदी माजी प्रशासक बी. जे. देशमुख यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. या नियुक्तीसाठी प्रशासकीय मंडळाने ठराव करून दिला होता.

देशमुख यांच्या नियुक्तीनंतर नाट्यमय घडामोडींनतर प्रशासकीय मंडळ बरखास्त करण्यात आले व देशमुख यांची एक सदस्यीय प्रशासकीय मंडळ म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामुळे प्रशासकीय मंडळावरील सदस्य नाराज झाले होते.

दरम्यान, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट खासदार झाल्याने, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाली. पाटील यांच्या नियुक्तीमुळे समर्थकांचा आत्मविश्‍वास वाढला असून, दिलीप खैरे आणि भूषण तुपे यांची नावे नक्की असल्याचे समजते. 

ताकही फुंकून पिण्याची वेळ 

काही सदस्यांच्या नियुक्त्यांमुळे चर्चेत राहिलेल्या या मंडळावरील नियुक्त्यांबाबत चंद्रकांत पाटील गांभीर्याने विचार करत आहेत. मागील नियुक्त्यांमुळे दुधाने तोंड भाजल्यानंतर आता ताकही फुंकून पिण्याची वेळ भाजपवर आली आहे. या नियुक्त्यांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांना बळ मिळण्याची चर्चा आहे. 

खैरे यांना बक्षिसी?
दिलीप खैरे हे चंद्रकांत पाटील यांच्या मर्जीतील कार्यकर्ते असून, बारामती लोकसभा निवडणुकीत खैरे यांनी कांचन कुल यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. विविध नियोजनांमध्ये खैरे मंत्री पाटील यांच्या सोबत होते. त्यामुळे खैरे यांना पुन्हा बाजार समितीची बक्षिसी मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख