दिलीप गांधींना नगर महापालिकेत झालेला आप्तेष्टांचा पराभव महागात पडला 

नगर महापालिकेत घरच्याच उमेदवारांना निवडून आणू न शकलेल्या दिलीप गांधी यांच्याबददल नाराजी होतीच ,प्रत्यक्ष विरोधी पक्षनेत्याचा मुलगा सुजय राधाकृष्ण विखे पाटील भाजपत आल्याने हा बदल सोपा झाला असावा.निष्ठावंतांना त्यामुळे काय वाटेल ते दिसेलच.
दिलीप गांधींना नगर महापालिकेत झालेला आप्तेष्टांचा पराभव महागात पडला 

मुंबई : नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रत्येक निवडणुकीत मतदारांना सामोरे जाताना अर्ध्याहून जास्त उमेदवार बदलतात .या वास्तवाला महाराष्ट्राच्या पहिल्या यादीने असत्य ठरवले आहे. सुनील गायकवाड (लातूर ) आणि दिलीप गांधी ( अहमदनगर ) वगळता सर्व खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.सेनेचे कटटर विरोधक किरीट सोमैया यांना मात्र सध्या गॅसवर ठेवण्यात आल्याचे दिसते. 

नगर महापालिकेत घरच्याच उमेदवारांना निवडून आणू न शकलेल्या दिलीप गांधी यांच्याबददल नाराजी होतीच ,प्रत्यक्ष विरोधी पक्षनेत्याचा मुलगा सुजय राधाकृष्ण विखे पाटील भाजपत आल्याने हा बदल सोपा झाला असावा.निष्ठावंतांना त्यामुळे काय वाटेल ते दिसेलच.

विदर्भातील सर्व भाजप उमेदवारांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या कार्यसम्राट रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरात पुन्हा संधी दिली जाणार हे उघड होते.त्यांच्याचसमवेत गृहराज्यमंत्री हंसराज अहीर ( चंद्रपूर ) आणि संरक्षणराज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे ( धुळे) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.वर्ध्याहून चंद्रकांत तडस यांना ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी मुलगा समीर (गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार) याच्यासाठी आग्रह धरल्याने डावलले जाईल काय अशी भीती होती.  मात्र जनसंपर्कात आघाडीवर असलेल्या तेली समाजातील तडस यांच्यावर अन्याय झाला नाही. 

अकोला येथून सलग तीन वेळा संजय धोत्रे तर गडचिरोलीतून अशोक नेते दोन वेळा निवडून आले आहेत. ऍन्टी इन्कम्बन्सीचा मुददा पुढे येत नसल्याचे सर्वेक्षणातून पुढे आल्याने त्यांना उमेदवारी मिळाली. भंडाऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल आहेत काय याचाअंदाज आल्यावर भाजपचा उमेदवार ठरेल. डॉ.परिणय फुके यांचे नाव आघाडीवर आहे. 

राष्ट्रवादीतून भाजपत आलेल्या विजयकुमार गावीत यांच्या कन्या डॉ.हीना गावीत ( नंदूरबार) स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम (बीड) एकनाथ खडसे यांच्या स्नूषा रक्षा ( रावेर ) तसेच भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनम प्रमोद महाजन (उत्तर मध्य मुंबई )या तरूणी ब्रिगेडलाही संधी दिली आहे. एकाही महिलेला डावललेले नाही. 

लातुरात सुनील गायकवाड यांच्याबददल नाराजी होती. मुख्यमंत्री फडणवीस यांचे खंदे समर्थक कामगार मंत्री संभाजीरावनिलंगेकर यांचे विश्‍वासू सुधाकर शृंगारपुरे यांना उमेदवारी दिली ते निवडून येण्याच्या विश्‍वासामुळे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com