dilip deshmukh | Sarkarnama

आ. दिलीप देशमुखांना सहकार न्यायालयाचा दणका 

सरकारनामा न्यूजब्युरो 
शनिवार, 11 मार्च 2017

जागृती शुगर्स व मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना या समव्यवसायी दोन्ही संस्थेत संचालक असलेल्या आमदार दिलीप देशमुख यांना सहकार न्यायालयाने दणका दिला आहे. त्यांची मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर असलेली संचालकपदाची निवड रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लातूर : जागृती शुगर्स व मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना या समव्यवसायी दोन्ही संस्थेत संचालक असलेल्या आमदार दिलीप देशमुख यांना सहकार न्यायालयाने दणका दिला आहे. त्यांची मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर असलेली संचालकपदाची निवड रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी दिलीपराव देशमुख हे मांजरा कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी देखील अपात्र ठरले आहेत. 

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख ऍड. बळवंत जाधव यांनी शुक्रवारी (ता. 10) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याची 2015 मध्ये निवडणूक झाली होती. यावेळी उत्पादक, बिगरउत्पादक व पणन मतदारसंघातून उमेदवार असलेल्या दिलीप देशमुख यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावल्यामुळे त्यांची संचालकपदी निवड झाली. मांजरा सहकारी साखर कारखान्यावर संचालक असतानाच दिलीप देशमुख हे जागृती शुगर्सचे संस्थापक संचालक देखील आहेत. सहकार कायद्यातील नियमानुसार समव्यवसायी संस्थेत कार्यरत असल्याने त्यांना साखर कारखान्याच्या संचालकपदी राहता येत नाही, त्यामुळे त्यांचे संचालकपद रद्द करावी अशी मागणी करणारी विनंती याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

न्यायालयाच्या निर्देशावरून हे प्रकरण सहकार न्यायालयात दाखल करण्यात आले. सहकार न्यायालयाने अर्जदाराने सादर केलेले व उपलब्ध पुरावे तपासले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्यानंतर न्यायालयाने दिलीप देशमुख यांना मांजरा कारखान्यावरील संचालकपदी अपात्र ठरवले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख