मंगळवेढ्याच्या चव्हाणांनी केला अनगरच्या पाटलांचा पराभव

कॉंग्रेसच्या दोन सदस्यांनी पक्षादेश झुगारत भाजप आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
solapur zp
solapur zp

सोलापूर : राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस हे तीन प्रमुख पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळविली मात्र, त्याला पहिला सुरुंग सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी लागला आहे. कॉंग्रेसच्या दोन सदस्यांनी पक्षादेश झुगारत भाजप आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना जिल्ह्यात मात्र भाजप आघाडीसोबत राहिली. त्यामुळे सत्तेचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या पदरी निराशाच आली.

अध्यक्षपदाच्या निवडीवेळी कॉंग्रेसचे सदस्य कृषी समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील व शीलवंती भासगी यांनी भाजप समविचारी आघाडीच्या अनिरुद्ध कांबळे यांना मतदान केले. श्री. कांबळे हे शिवसेनेच्या तिकिटावर सदस्य म्हणून निवडून आले आहेत. ते माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक आहेत. शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांना मानणाऱ्या सांगोल्यातील अतुल पवार व गोविंद जरे या दोन्ही सदस्यांनी भाजप आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे करमाळ्याबरोबर सांगोल्याची शिवसेनाही भाजप आघाडीसोबत राहिली. मल्लिकार्जुन पाटील यांनी अध्यक्ष निवडीवेळी कांबळे यांना तर उपाध्यक्ष निवडीवेळी महाविकास आघाडीच्या विक्रांत पाटील यांना मतदान केले. याशिवाय नीलकंठ देशमुख यांनी अध्यक्ष निवडीवेळी करमाळ्यातील त्यांचे सहकारी भाजप आघाडीच्या कांबळे यांना तर उपाध्यक्ष निवडीवेळी महाविकास आघाडीच्या पाटील यांना मतदान केले.

भाजप समविचारी आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार श्री. कांबळे यांना शिवानंद पाटील, विजयराज डोंगरे, सुभाष माने, अनिरुद्ध कांबळे, तानाजी खताळ, किरण मोरे, शीला शिवशरण, मंजुळा कोळेकर, सुनंदा फुले, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, शैला गोडसे, संगीता डोईफोडे, अण्णाराव बाराचारे, मदन दराडे, आनंद तानवडे, दिलीप चव्हाण, गोविंद जरे, अतुल पवार, सविता गोसावी, शीलवंती भासगी, मंगल कल्याणशेट्टी, प्रभादेवी पाटील, रुक्‍मिणी ढोणे, शोभा वाघमोडे, लक्ष्मी आवटे, सवितादेवी राजेभोसले, मंगल वाघमोडे, शितलदेवी मोहिते-पाटील, रजनी देशमुख, अरुण तोडकर, ज्योती पाटील, साक्षी सोरटे, गणेश पाटील, मल्लिकार्जुन पाटील, वसंत देशमुख, नीलकंठ देशमुख, संगीता मोटे या 37 सदस्यांनी हात उंचावून मतदान केले.

महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार श्री. धाईंजे यांना राणी वारे, शुभांगी उबाळे, रणजितसिंह शिंदे, रोहिणी मोरे, अंजनादेवी पाटील, रोहिणी ढवळे, भारत शिंदे, रेखा राऊत, श्रीमंत थोरात, रेखा भूमकर, बळीराम साठे, उषा सुरवसे, विक्रांत पाटील, उमेश पाटील, शिवाजी सोनवणे, अतुल खरात, ऋतुजा मोरे, त्रिभुवन धाईंजे, स्वाती कांबळे, संगीता धांडोरे, दादासाहेब बाबर, सचिन देशमुख, अनिल मोटे, नितीन नकाते, रेखा गायकवाड, संजय गायकवाड, अमर पाटील, विद्युलता कोरे, स्वाती शटगार या 29 सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. उपाध्यक्ष पदासाठी भाजप आघाडीच्या दिलीप चव्हाण यांना मल्लिकार्जुन पाटील व नीलकंठ देशमुख या दोन सदस्यांनी मतदान न केल्यामुळे त्यांना 35 मते पडली.
 
34 वर्षानंतर पराभव
माजी आमदार (कै.) बाबूराव पाटील यांचा 1985 साली नरखेडच्या (कै.) शहाजीराव पाटील यांनी आमदारकीच्या निवडणुकीत पराभव केला होता. त्यानंतर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांचा 1986 ला पराभव झाला होता. त्यानंतर अनगरच्या पाटलांना पराभव माहीत नव्हता. मात्र, आज जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंगळवेढ्याच्या दिलीप चव्हाण यांनी विक्रांत पाटील यांचा चार मतांनी पराभव केला. उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यासाठी कोणीच तयार नव्हते. आपल्याला पक्षाने आदेश दिल्यामुळे आपण उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याचे उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या विक्रांत पाटील यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com