'कसे आहात बाबा' म्हणत दिलीप भालेराव थेट खळ्यावर

dilip-bhalerao
dilip-bhalerao

उमरगा : " कसे आहात बाबा, सोयाबीन किती झालं' अस म्हणत कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार दिलीप भालेवर शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी थेट सोयाबीनच्या खळ्यावर जात आहेत. सध्या शेतकरी, शेतमजूर शेतीच्या कामात व्यस्त आहेत. अशावेळी उमेदवार थेट शेतात जाऊन त्यांची विचारपूस करत असल्याने यांची चर्चा चांगलीच रंगते आहे.

उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार दिलीप भालेराव यांनी ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे. बैठका, प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून ते मतदारांशी संवाद साधत आहेत

मतदारांमध्ये शेतकरी हा देखील एक प्रमुख घटक आहे. किंबहुना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरच निवडणूक प्रचारात भर देखील दिला जात आहे. अशावेळी संपकातून एकही शेतकरी सुटू नये याची काळजी उमेदवार घेतांना दिसत आहेत. दिलीप भालेराव यांनी देखील थेट शेतात खळ्यावर जाऊन शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करण्यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांना" कसे आहात बाबा ... उत्पन्न कसे निघत आहे. गतवर्षीच्या खरिपाचे अनूदान मिळाले का? अशी विचारणा ते करीत आहेत.

सरकारने संपूर्ण कर्जमाफीचा शब्द दिला होता तो पाळला नाही हे सांगतानाच, कॉंग्रेसने 65 वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदतीची जाणीव असू द्या यांची आठवण भालेराव करून देतांना दिसतात. कॉंग्रेस पक्षाला समर्थन देऊन तुम्हा शेतकऱ्यांचे हित जोपासण्याची संधी द्या, अशी विनंतीही ते करतायेत.

भालेराव गेल्या आठ दिवसापासुन प्रचारासाठी फिरत आहेत. उमरगा-लोहारा तालुक्‍यात कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने गेल्या 35-40 वर्षात अनेक विकासाची कामे केली आहेत. आमदार बसवराज पाटील यांनी विठ्ठल- साई साखर कारखान्याची निर्मिती करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नतीची दारे खूली केल्याचेही ते प्रचारा दरम्यान सांगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com