dilip barate oppositon leader in PMC | Sarkarnama

दिलीप बराटे पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते! तांबे, धनकवडे यांना झटका!!

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

पुणे : पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या गटनेतेपदी माजी उपमहापौर दिलीप बराटे यांची आज निवड करण्यात आली. त्यामुळे तेच आता महापालिकेचे विरोधी पक्षनेते होणार असल्याचे निश्चित आहे.

पुणे : पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या गटनेतेपदी माजी उपमहापौर दिलीप बराटे यांची आज निवड करण्यात आली. त्यामुळे तेच आता महापालिकेचे विरोधी पक्षनेते होणार असल्याचे निश्चित आहे.

मावळते गटनेते चेतन तुपे यांच्याकडे तीन महिन्यांपूर्वी शहराध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी इतरांना नेमले जाणार, याची चर्चा होती. त्यानुसार आता बराटे यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. बराटे हे वारजे येथून चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. उपमहापौर म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवून नागरिकांच्या हिताची कामे मार्गी लावू, असे बराटे यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची आज दुपारी दोन वाजता बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला.

या नावासाठी विशाल तांबे आणि दत्ता धनकवडे यांची नावे आघाडीवर होती. मात्र दोघांनाही संधी मिळालेली नाही. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांना हे पद मिळणार, हे निश्चित होते. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनीही आग्रह धरला होता. त्यामुळे या दोघांच्या नावांची चर्चा होती. मात्र या मतदारसंघातीलच बराटे यांची निवड झाली.

खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीकडे विधानसभेसाठी अनेकज जण इच्छुक आहेत. त्यात बराटे यांचेही नाव आहे. त्यांना आता पद मिळाल्याने आगामी निवडणुकीसाठी त्यांना डावलले जाणार की त्यांना ताकद देण्यासाठी हे पद देण्यात आले, याची आता चर्चा आहे. इतर इच्छुकांच्या म्हणण्यानुसार बराटे यांना पद मिळाल्याने विधानसभा उमेदवारीच्या स्पर्धेतून त्यांचे नाव आपोआप बाहेर पडले आहे.

बराटे यांच्या निवडीचे पत्र राष्ट्रवादीतर्फे महापौरांना देण्यात येईल. त्यानंतर महापौर बराटे यांना विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र देतील.    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख