खडसे यांचा `फुटबाॅल` : राज्यसभेत घ्यायला दिल्ली नाखूष; विधान परिषदेसाठी फडणविसांचा नकार

खडसेंना दिल्लीत पाठविले तर घराणेशाही ठसठशीतपणे दिसणार आणि मुंबईत विधान परिषदेत ठेवले तर फडणवीस यांनी बसविलेली भाजपची राज्यातीलसारी घडी विस्कळित होणार. त्यामुळे त्यांचे नक्की काय करायचे, असा प्रश्न आहे.
eknath khadase and devandra fadnavis
eknath khadase and devandra fadnavis

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे राजकीय पुनर्वसन कसे करायचे, असा पेच सध्या भाजप नेतृत्त्वासमोर आहे. एवढेच नाही तर त्यांच्या पुनर्वसनासाठी दिल्लीतील आणि राज्यातील नेत्यांतही मतभेद असल्याची चर्चा आहे. खुद्द खडसे यांनीही आपल्याला काय हवे, हे स्पष्टपणे सांगितलेले आहे. मात्र त्यांना ते हवे देण्यास देवेंद्र फडणवीस तयार नसल्याचे उघड आहे.

दिल्लीतल पक्षश्रेष्ठींच्या म्हणण्यानुसार एकनाथ खडसे यांना विधान परिषदेवर संधी देणे योग्य राहील. त्याची कारणेही त्यांनी राज्यातील नेत्यांना समजावून सांगितली आहे. खडसे यांच्या सून रक्षा या लोकसभेच्या खासदार आहेत. खडसे यांना राज्यसभेवर घेतले तर देशातील दुर्मिळ असे उदाहरण खडसे भाजपसाठी घालून देतील. सून लोकसभेत आणि सासरा राज्यसभेत, असे होणार आहे. घराणेशाहीला विरोध करणाऱ्या भाजप कोणत्या तोंडाने या व्यवस्थेचे समर्थन करणार? त्यामुळे त्यांचे पुनर्वसन तुम्ही राज्यातच करण्याबाबत विचार करा, असा सल्ला दिल्लीतील नेत्यांनी प्रदेश नेत्यांनी दिला आहे.

खडसे यांचे राज्यात म्हणजे विधान परिषदेत पुनर्वसन करण्यास देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप आहे. त्याला दोन-तीन महत्त्वाची कारणे आहेत. खडसे हे विधान परिषदेवर गेल्यास ते पक्षाच सर्वांत ज्येष्ठ आमदार तेथे ठरतील. त्यांच्या तुलनेने बरेच ज्युनिअर असलेले प्रवीण दरेकर हे तेथे विरोधी नेते आहेत. त्यांच्या हाताखाली काम करण्यास खडसे तयार नाहीत. विधान परिषदेवर घ्यायचे तर मला तेथे विरोधी पक्षनेतेपद द्या, अशी खडसे यांची मागणी आहे. खडसे यांना विरोधी नेतेपद देणे म्हणजे पक्षात गोंधळ माजण्यास खतपाणी घालण्यात होईल, अशी फडणवीस यांच्या समर्थकांची भूमिका आहे.

विधानसभेत एखाद्या मुद्यावर फडणवीस यांनी मत मांडले तर नेमके त्याच्या विरोधात मत देऊन खडसे हे फडणवीस यांना वारंवार तोंडघशी पाडू शकतात. तसेच पक्षात दुसरे सत्ताकेंद्र निर्माण झाल्याने सारीच परिस्थिती विचित्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खडसे यांचे नक्की काय करायचे, असा पेच भाजप पक्षश्रेष्ठींसमोर आहे. त्यांना राज्यपाल म्हणून इतर राज्यांत पाठविण्याचा सल्ला काही नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांना दिला. मात्र पंतप्रधान मोदी यांचा खडसे यांना ते पद देण्यास नकार असल्याने ती संधी पण खडसेंसाठी दुरापास्त झाली आहे. या साऱ्या परिस्थिती खडसे यांची कोठे वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com