digvijaysingh said hame sarkar chalana ata hai | Sarkarnama

हमे सरकार चलाना आता है ! दिग्वीजयसिंह यांना विश्वास 

वृत्तसंस्था
रविवार, 16 डिसेंबर 2018

भोपाळ : पैसे की कुछ कमी नही, हमे सरकार चलाना आता है !असा विश्वास कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्वीजय सिंह यांनी व्यक्त केला आहे. 

मध्यप्रदेशात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आले आहे. आज दुपारी कमलनाथ हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. या शपथविधि समारंभाला कॉंग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

त्या पार्श्‍वभूमी पत्रकारांनी सिंह यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की कमलनाथ हे ज्येष्ठ नेते आहेत. संकटाचा सामना कसा करायचा याचा अनुभव त्यांना आहे. मध्यप्रदेशात काही प्रश्‍न आहेत. शेतकऱ्यामध्ये नाराजी आहे. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत हे ही मान्य मात्र आम्हाला सरकार चालवू शकतो. आम्हाला सरकार चालवता येते. 

युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की शिंदे हे तुलनेने तरूण आहेत. त्यांना उज्ज्वल भविष्य आहे. ते चांगले वक्ते आणि नेतेही आहेत. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते. आज कॉंग्रेससाठी आम्ही सर्वजन एकत्र आलो आहोत. पदापेक्षा कॉंग्रेस आमच्या दृष्टिने महत्त्वाची आहे असेही सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख