digvijaysingh and cm | Sarkarnama

विठ्ठलाबद्दल खरी भक्ती असती तर मुख्यमंत्री पंढरपूरला गेले असते - दिग्विजयसिंह

उमेश घोंगडे
सोमवार, 23 जुलै 2018

पुणे : मराठा आरक्षण व धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी दिलेल्या भूलथापा आता त्यांच्या अंगलट येत असून विठ्ठलाविषयी त्यांना खरेच भक्ती असती तर ते पंढरपूरला नक्की गेले असते, अशी टीका मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी आज पुण्यात केली. गेल्या अनेक वर्षापासून दिग्विजयसिंह हे आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात. आज पंढरपूरहून आल्यानंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. 

धनगर व मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री गेल्या तीन-चार वर्षापासून थापा मारत आहेत. आरक्षणाच्या विषयावरुन या दोन्ही समाजातील लोकांना झुलवत ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. या प्रश्‍नावरून मराठा समाज आता आक्रमक झाला असून त्याचा परिणाम त्यांना विठ्ठलाच्या महापूजेपासून दूर राहावे लागत आहे. त्यांच्यावर आलेल्या या परिस्थितीला ते स्वत:च जबाबदार असल्याची टीका दिग्विजयसिंह यांनी केली. 

लोकसभेत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयावर चर्चा न करता त्यांनी पंतप्रधान मोदी याना मारलेल्या मिठीवरून चर्चा होत आहे. वास्तविक यामुळे संसदीय परंपरेला कोणतीच बाधा येत नाही. मात्र मूळ प्रश्‍नावर चर्चा न करता त्यावरही राजकारण होत असल्याची टीका त्यांनी केली. येत्या निवडणुकीत मोदीविरोध हा निवडणुकीचा मुद्दा अजिबात राहणार नाही. कॉंग्रेस ही निवडणूक मुद्यावर आधारित लढेल, असे दिग्विजयसिह यांनी सांगितले. छोट्या-मोठ्या गोष्टीवर ट्‌विट करणारे देशाचे पंतप्रधान मोदी हे देशातील झुंडशाही पद्धतीने होत असलेल्या हल्ल्यावर बोलत नाहीत. राम मंदिराचा मुद्दा केवळ राजकारणासाठी वापरला जात आहे. आतादेखील निवडणुका जिंकण्यासाठी रामाचा आधार घेतला जाईल, अशी टीका त्यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख