विनय कोरेंच्या अंगावर पाणी फेकले?

विनय कोरेंच्या अंगावर पाणी फेकले?

हातकणंगले ः हातकणंगले विधानसभा मतदार संघातून जनसुराज्य शक्तीचे माजी आमदार राजीव आवळे यांना डावलून दुसऱ्याला उमेदवारी दिल्याचे तीव्र पडसाद काल उमटले.

"जनसुराज्य' चे उमेदवार व भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोक माने यांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः आलेले "जनसुराज्य' चे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांच्या अंगावर श्री. आवळे यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी पाणी फेकल्याची चर्चा आहे. या घटनेने निवडणूक निर्णय अधिकऱ्यांच्या कार्यालयाबाहेर काही काळ गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना पांगवले.

भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन अशोक माने यांनी "जनसुराज्य' ची उमेदवारी स्विकारली. याच मतदार संघातून 2004 ते 2009 या काळात माजी आमदार राजीव आवळे यांनी "जनसुराज्य' चे प्रतिनिधीत्त्व केले होते. त्या निवडणुकीत श्री. आवळे यांनी या मतदार संघाचे तब्बल 25 वर्षे प्रतिनिधीत्त्व केलेले कॉंग्रेसचे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचा पराभव केला होता.


या निवडणुकीतही राजीव आवळे हे "जनसुराज्य' कडून लढण्यास इच्छुक होते, त्यांनी पक्षाकडे उमेदवारीचीही मागणी केली होती. पण त्यांना डावलून श्री. माने यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे आवळे यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचे बोलले जाते. श्री. कोरे हेही कधी आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी येत नव्हते, आज ते पहिल्यांदाच अर्ज भरण्यासाठी आले आणि हा प्रकार झाला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com