अहमदनगर: ‘डायल युवर पोलीस ऑफिसर’ हा राज्यातील पहिलाच उपक्रम असून अहमदनगर जिल्ह्यात या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सायबर सेल कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन व राज्यातील पहिल्या ‘डायल युवर पोलीस ऑफिसर’ या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक घनःशाम पाटील, श्रीरामपूरचे अप्पर पोलिस अधीक्षक रोहीदास पवार, सहा पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, सायबर सेलचे पोलिस निरिक्षक सुनिल पवार आदींची यावेळी उपस्थिती होती.
वेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले," डायल युवर पोलीस ऑफिसर उपक्रम राज्यातील पहिलाच उपक्रम असून नगर जिल्ह्यात हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. या माध्यमातून पोलीस अधीक्षक, पोलिस अधिकारी यांच्याशी थेट संपर्क साधता येणार आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी या उपक्रमाचा नक्कीच उपयोग होईल."
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी , डायल युवर पोलीस ऑफिसर उपक्रम निश्चितच नागरिकांना आधार वाटेल, असा विश्वास व्यक्त केला . प्रास्ताविक श्रीमती गिता कळमकर यांनी केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.