कर्जमाफीसाठी धुळे जिल्ह्यात शिवसेनेचे 'जलसमाधी' आंदोलन सुरू

काल रात्रभर पाच ते सहा आंदोलक कार्यकर्ते पाण्यातच उभे होते. गळ्यापर्यंत पातळी असलेल्या तापी नदीच्या पाण्यात आंदोलक उभे असून ते मागे हटत नसल्याने पोलिस हतबल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचे पत्र मिळत नाही, तोपर्यंत जलआंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलकांनी कायम ठेवल्याने जिल्हा प्रशासन पेचात व चिंतेत पडले आहे.
कर्जमाफीसाठी धुळे जिल्ह्यात शिवसेनेचे 'जलसमाधी' आंदोलन सुरू

निमगूळ - शेतकरी संपाला पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांवर राज्य सरकारने दोन दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास 'आम्ही दोन दिवस असेच पाण्यात उभे राहू, नंतर अन्नत्याग करू, प्रसंगी जलसमाधी घेऊ', असे सांगत शिंदखेडा तालुक्‍यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बुधवारपासून साहूर (ता. शिंदखेडा, जि. धुळे) गावालगत तापी नदीपात्रात जलआंदोलन सुरू केले. ते अद्याप सुरूच आहे.

काल रात्रभर पाच ते सहा आंदोलक कार्यकर्ते पाण्यातच उभे होते. गळ्यापर्यंत पातळी असलेल्या तापी नदीच्या पाण्यात आंदोलक उभे असून ते मागे हटत नसल्याने पोलिस हतबल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचे पत्र मिळत नाही, तोपर्यंत जलआंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलकांनी कायम ठेवल्याने जिल्हा प्रशासन पेचात व चिंतेत पडले आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी बुधवारी दुपारी पाचनंतर मुसळधार पावसाला सुरवात झाल्याने तापी नदीची पातळी वाढती आहे. त्यात जलआंदोलनातील शिवसेनेचे कार्यकर्ते माघार घेत नसल्याने त्यांच्या मागणीचे पत्र अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सायंकाळनंतर 'फॅक्‍स' केले. प्रभारी तहसीलदार रोहिदास वारुळे, मंडलाधिकारी एम. एन. शास्त्री, करमणूक कर निरीक्षक पंडित धावळे, साहूरचे तलाठी मनोहर पाटील आदी संबंधित आंदोलकांची मनधरणी करण्यात गुंतलेले आहेत. आंदोलक पाण्यात आणि महसुली अधिकारी, पोलिस काठावर असे चित्र रात्री दहानंतरही कायम होते.

आंदोलनात ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे, उपजिल्हाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे, तालुकाप्रमुख विश्‍वनाथ पाटील, कल्याण बागल, शहरप्रमुख चेतन राजपूत, राजू रगडे, मयूर निकम, गिरीश पाटील, हिरालाल बोरसे आदी सहभागी आहेत. रात्रभर जनआंदोलन सुरु आहे. रात्रभर शानाभाऊ सोनवणे, राजू रगडे, मयूर निकम, गणेश भदाणे, राकेश राजपूत, कैलास ठाकूर , योगेश सोनवणे, राकेश सोनवणे, हितेंद्र सोनवणे पाण्यात होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com