धुळ्यात आधी म्हणाले पिस्तूल आता म्हणतात लायटर सापडले ! 

देवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिस्तूल व 50 हजाराची रोकड, काही आधारकार्ड, रेशनकार्ड ताब्यात घेतले.
धुळ्यात आधी म्हणाले पिस्तूल आता म्हणतात लायटर सापडले ! 

धुळे  : धुळे शहरात तक्रारीनंतर नेहरू चौक परिसरात दुपारी सव्वातीनला 50 हजाराची रोकड आणि मेड इन चायना लिहिलेली पिस्तूल सापडली. पोलिसांनी गतीने तपास सुरू केल्यानंतर ती पिस्तूल नव्हे तर "गॅस लायटर' असल्याचे समोर आले.

तोपर्यंत शहरात पैसे वाटप आणि पिस्तूल सापडल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात तथ्य नसल्याचा प्राथमिक दावा देवपूर पोलिसांनी केला.

धुळे शहर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि दोन अपक्ष उमेदवारांमध्ये काटा लढत होत आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. असे असताना देवपूरमधील नेहरू चौक परिसरातील मेडिकल दुकानाजवळ दुपारी सव्वातीनला पैसे वाटप होत असल्याची एका कार्यकर्त्याकडून तक्रार झाली.

त्यावरून देवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिस्तूल व 50 हजाराची रोकड, काही आधारकार्ड, रेशनकार्ड ताब्यात घेतले. 

तपासाअंती पोलिसांना पिस्तूल नव्हे तर "गॅस लायटर' असल्याचे निष्पन्न झाले. तसेच 50 हजाराची रोकड कामकाजातील भाग होती, असे सिद्ध करून दाखविण्याचा प्रयत्न संबंधित दोघांकडून सुरू होता.

भरारी पथकाकडून दुपारी सव्वाचारनंतरही चौकशी सुरू होती. या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता. तसेच कुणालाही ताब्यात घेतलेले नव्हते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com