काँग्रेसची अवस्था 'आधे इधर जाव, आधे उधर जाव...' अशी : देवेंद्र फडणवीस

''निवडणुकीच्या आखाड्यात महायुतीचे पैलवान दंड थोपटत आहेत. पण समोरून लढायलाच कोणी नाही. काँग्रेसचे राहुल गांधी निवडणुकीपूर्वी पराभव मान्य करून बँकॉकला निघून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आधे इधर जाव, आधे उधर जाव, बाकी मेरे पिछे आव अशी आहे,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीची खिल्ली उडवली.
Devendra Fadanavis Election Meeting At Shirpur Dhule District
Devendra Fadanavis Election Meeting At Shirpur Dhule District

शिरपूर : ''निवडणुकीच्या आखाड्यात महायुतीचे पैलवान दंड थोपटत आहेत. पण समोरून लढायलाच कोणी नाही. काँग्रेसचे राहुल गांधी निवडणुकीपूर्वी पराभव मान्य करून बँकॉकला निघून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आधे इधर जाव, आधे उधर जाव, बाकी मेरे पिछे आव अशी आहे,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीची खिल्ली उडवली.

येथील भाजप-सेना युतीचे उमेदवार कांशीराम पावरा यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ.सुभाष भामरे, खासदार डॉ. हीना गावित, धुळे मनपाचे महापौर चंद्रकांत सोनार, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल उपस्थित होते. या सभेत माजी शिक्षणमंत्री अमरिषभाई पटेल, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी दहिते, माजी अध्यक्षा संगीता देसले, राजेंद्र देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. 

मुख्यमंत्री म्हणाले, ''आघाडीचा जाहीरनामा त्यांची पराभूत मानसिकता दाखवणारा आहे. आपली सत्ता येणार नाही हे उमगल्याने अशक्यप्राय आश्वासने त्यांनी दिली आहेत. प्रत्येकाला ताजमहाल बांधून देऊ असे आश्वासन द्यायचेच शिल्लक ठेवले आहे. गेल्या पाच वर्षात राज्यात शेतकऱ्यांना 50 हजार कोटी रुपयांची मदत दिली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 30 हजार किमीचे रस्ते, 10 हजार किमीचे राज्य महामार्ग तर 20 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग झाले.'' देशाच्या 25 टक्के रोजगार निर्मिती महाराष्ट्रात झाली आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यां यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com