dhok maharaj about pankaja munde cm post | Sarkarnama

पंकजाताई मुख्यमंत्री व्हाव्यात, पण मग देवेंद्रभाऊंचे काय होणार? 

सुधीर पटारे 
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

मुंडे म्हणाल्या, दिलेला शब्द पाळायचा, हे वडिलांनी शिकविले.

नगर : पंकजाताई मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी महाराष्ट्राची इच्छा आहे, पण मग आमच्या नागपुरच्या देवेंद्रभाऊंचे काय, असा सवाल रामराव ढोक महाराज यांनी व्यक्त केला. 

निघोज (ता. पारनेर) येथे रामराव ढोक महाराज यांचे अभिष्ठचिंतन व समाधान महाराज शर्मा यांच्या रामायण कथेची सांगता या कार्यक्रमात ढोक महाराज बोलत होते. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, उपस्थित होते. 

मुंडे म्हणाल्या, आमच्या वडिलांचा संघर्षाचा वारसा आहे. दिलेला शब्द पाळायचा, हे वडिलांनी शिकविले. शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या. अनेक कामे मार्गी लावता आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख