पुणे पालिकेत धीरज घाटेंचा नवा " फॉर्म्युला '; सब साथ चलो

विरोधक म्हटले की अनेक विषयात मतभेत असू शकतात. मात्र, महापालिकेचा कारभार अधिक चांगला आणि सर्वसमावेशक चालण्यासाठी विरोधकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे घाटे यांनी सांगितले. सभागृहाचे कामकाज चालविताना मतभेद झाले तरी त्यातून मार्ग काढत सौहर्दपूर्ण वातावरणात काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 पुणे पालिकेत धीरज घाटेंचा नवा " फॉर्म्युला '; सब साथ चलो

पुणे : सभागृहात प्रचंड बहुमताच्या ताकदीवर वाटेल ते विषय रेटून नेल्यानंतर स्वपक्षीयांसह विरोधकांची नाराजी पदरात पाडून घेणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आता राजकीय शहणपण सुचले आहे. आपली "एकला चलो'ची भूमिका बाजुला करीत नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधकांसोबत घेऊन कारभार हाकण्याची तयारी केली आहे. भाजपच्या या पवित्र्यामुळे विरोधक आवाक झाले आहेत. या मोहिमेचा प्रारंभ नवे सभागृह नेते धीरज घाटे यांनी केला आहे. परिणामी यापूर्वी विरोधकांसोबत असलेले काहीसे तणावाचे वातावरण संपून महापालिकेत चहापानासोबतच जेवणावळी झडू लागल्या आहेत. 

अडीच वर्षाच्या आधीच्या "टर्म'मध्ये मुक्ता टिळक यांनी महापौरपद तर श्रीनाथ भिमाले यांनी सभागृहनेतेपद भूषविले. अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत 164 पैकी भाजपाचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे विरोधकांना न जुमानता सत्ताधारी भाजपाने अनेक विषय बहुमताच्या जोरावर रेटून नेले. घाटे यांनी सभागृह नेतेपद स्वीकारल्यानंतर या भूमिकेत काहीसा बदल झाला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी तसेच शिवसेनेचे नगरसेवक तसेच त्यांच्या गटनेत्यांबरोबर समन्वयाची भूमिका घेऊन सभागृहाचे कामकाज चालविण्याचा निर्धार घाटे यांनी केला आहे. 

विरोधक म्हटले की अनेक विषयात मतभेत असू शकतात. मात्र, महापालिकेचा कारभार अधिक चांगला आणि सर्वसमावेशक चालण्यासाठी विरोधकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे घाटे यांनी सांगितले. सभागृहाचे कामकाज चालविताना मतभेद झाले तरी त्यातून मार्ग काढत सौहर्दपूर्ण वातावरणात काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रयत्नांचा भाग म्हणून प्रत्येकवेळी आपल्याच दालनात बैठक न घेता इतर पक्षनेत्यांच्या दालनात बैठक घेऊन अधिकाधिक सकारात्मक वातावरण तयार करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे घाटे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com