`आष्टी का आमदार कैसा हो, जयदत्त धस जैसा हो; समर्थकांची मुख्यमंत्र्यासमोर घोषणाबाजी

`आष्टी का आमदार कैसा हो, जयदत्त धस जैसा हो; समर्थकांची मुख्यमंत्र्यासमोर घोषणाबाजी

आष्टी, ता. २६ : महाजनादेश यात्रेनिमित्त दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री' देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ‘आष्टी का आमदार कैसा हो, जयदत्त धस जैसा हो’ अशा घोषणांनी धस समर्थकांनी लक्ष वेधून घेतले. विधानसभा उमेदवारीच्या स्पर्धेत जयदत्त धस असल्याचे या निमित्ताने समोर आले. 

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश मंगळवारी (ता. २६) तालुक्यात आली होती. पाथर्डी-धामणगावमार्गे कडा व त्यानंतर आष्टी असे या यात्रेचे मार्गक्रमण झाले. दरम्यान, तालुक्यातील धामणगाव येथूनच यात्रेचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. कडा येथे यात्रा पोहचताच मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करून सुरेश धसांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी रथावर होते. मुख्य रस्त्यांवरून जाताना रथाच्या पुढे विधानसभेसाठी इच्छुक असलेले आमदार सुरेश धसांचे पुत्र जयदत्त धस यांना खांद्यावर उचलून समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी धस समर्थकांनी ‘आष्टी का आमदार कैसा हो, जयदत्त धस जैसा हो’चा जोरदार गजर केला. मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदारद्वयींच्या रथासमोर झालेल्या या घोषणाबाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

आमदार भीमराव धोंडे 2014मध्ये भाजपकडून आष्टीचे आमदार झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे सुरेश धस यांचा पराभव केला होता. परंतु त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलून धस भाजपमध्ये आले. त्यांना विधानपरिषदेची आमदारकीही मिळाली. आता विधानसभेच्या तोंडावर पुत्र जयदत्तला आमदार करण्यासाठी धस यांच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जाते

. यापूर्वी आष्टी येथे झालेल्या मेळाव्यात ‘पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करू’ असे धस यांनी स्पष्टपणे सांगितले होते. परंतु, आता समर्थकांचा त्यांच्या चिरंजीवाबद्दल असलेल्या आग्रहाचे काय, असाही प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, तसेच धस-धोंडेंसमोर झालेल्या घोषणाबाजीने भाजपची उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत जयदत्त धस हेही असणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात आष्टीत कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे मतदारसंघासह जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com