dharmraj kadadi appeals | Sarkarnama

सिद्धेश्‍वर कारखान्याला रोज उठून त्रास देवू नका!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

‘‘कारखान्याच्या वीजनिर्मिती प्रकल्पातून २०१७-१८ मध्ये १९ कोटी आणि २०१८-१९ मध्ये २८ कोटी रुपयांची वीज विक्री झाली. कामगारांनी जागरूकपणे व एकजुटीने काम करून या वेळचा हंगाम यशस्वी करावा,’’ असे आवाहनही त्यांनी केले.  

सोलापूर (प्रतिनिधी) :'‘सिद्धेश्‍वरांच्या नावाने उभारलेल्या या साखर कारखान्याचे २८ हजार सभासद आहेत. दोन हजारांपेक्षा जास्त कामगारांची रोजीरोटी या कारखान्यावर अवलंबून आहे. त्यामुळे चिमणी पाडण्याच्या नावाखाली रोज उठून त्रास देणाऱ्यांनी विनाकारण वक्रदृष्टी ठेवू नये,’’ असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले. 

श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या ४७ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ काडादी यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष दीपक आलुरे, संचालक सिद्धराम चाकोते, माजी संचालक शिवानंद दरेकर, कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अशोक बिराजदार यांनी मनोगते व्यक्त केली. 

काडादी म्हणाले, ‘‘अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आधुनिक प्रकल्प उभारण्याचे सिद्धेश्‍वर कारखान्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. वीजनिर्मिती, मिल सेक्‍शन आणि बॉयलिंग हाउस नव्याने झाले आहेत. वीजनिर्मिती प्रकल्पामुळे अतिशय चांगले परिणाम दिसत असून, मोठा गाळप हंगाम झाला, तर आर्थिक चणचण कमी होऊन सभासदांना चांगला दर देता येईल.’’ 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख