भारत माता की जय म्हणणारेच देशात रहातील : धर्मेंद्र प्रधान

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54 वे प्रदेश अधिवेशनाचे उद्‌घाटन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले. महानगर मंत्री अनिल ठोंबरे, एमजीएमएनएलचे अध्यक्ष, स्वागत समिती सचिव राजेश पांडे, महापौर मुरलीधर मोहोळ, गिर्यारोहक अरुनिमा सिन्हा, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे, महानगर अध्यक्ष डॉ. शरद गोस्वामी, प्रा. सारंग जोशी, प्रमोद चौधरी यावेळी उपस्थित होते.
भारत माता की जय म्हणणारेच देशात रहातील : धर्मेंद्र प्रधान

पुणे : देशातील नागरिक नोंदणीला काहीजणांकडून मुद्दाम विरोध केला जात आहे, क्रांतिकारक उधमसिंग, भगत सिंह, सुभाषचंद्र बोस यांचे बलिदान वाया जाणार का ? आपल्याला देश धर्मशाळा बनवायचा का ? देशात भारत माता की जय म्हणणारेच राहू शकतील, असे वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54 वे प्रदेश अधिवेशनाचे उद्‌घाटन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले. महानगर मंत्री अनिल ठोंबरे, एमजीएमएनएलचे अध्यक्ष, स्वागत समिती सचिव राजेश पांडे, महापौर मुरलीधर मोहोळ, गिर्यारोहक अरुनिमा सिन्हा, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे, महानगर अध्यक्ष डॉ. शरद गोस्वामी, प्रा. सारंग जोशी, प्रमोद चौधरी यावेळी उपस्थित होते. 

प्रधान म्हणाले, काही असमजदार लोकांमुळे, राजकारणामुळे देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे. इतर देशात लोकशाही असली तरी अनेक गोष्टींवर बंधने आहेत. आपल्या देशात बंधने नसल्याने लोकशाही महान आहे. भारतात विचार भिन्नता, वैचारिक मतभेद आहेत, अशा वेळी देशात नागरिकता नोंदणी व्हावी की नाही यावरून वाद सुरू आहे. जगातील सर्व देशात लोकांची नोंदणी आहे.आपल्या देशातील लोकांची माहिती आपल्याकडे असतील पाहिजे. देशात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न सुरू असताना त्यांना रोखण्यासाठी अभाविपवर महत्वाची जबाबदारी आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com