येडं पेरलं अन्‌ खुळं उगवलं : धनंजय मुंडे कोणासं म्हणाले? 

येडं पेरलं अन्‌ खुळं उगवलं : धनंजय मुंडे कोणासं म्हणाले? 

पुणेः लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी 'येडं पेरलं आणि खुळं उगवलं' अशा शब्दात ट्‌विटरवरून टीका केली आहे. 

रावसाहेब दानवे हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. यामुळे विरोधक त्यांच्यावर टीका करताना दिसतात. जालना येथे दानवे यांनी भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांचा 'हेलिकॉप्टरचा पायलट' असा उल्लेख केला आहे. वास्तविक अभिनंदन हे भारताच्या फायटर विमानांचे जिगरबाज पायलट आहेत. दानवे यांच्या वक्तव्यानंतर दानवे त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. 

धनंजय मुंडे यांनी ट्‌विटरवरून टीका करताना म्हटले आहे की, 'बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक बेअक्कल, यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-21 आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष... 'येडं पेरलं आणि खुळं उगवलं' अशी गत आहे सगळी.' 

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या ट्‌विटरवर नेटिझन्स रिट्‌विट करत असून, प्रतिक्रियाही नोंदवत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com