रात्री एक पर्यंत धनंजय मुंडे सत्कार स्वीकारत होते पण गर्दी हटत नव्हती !

राज्याच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर श्री.मुंडे यांचा येथे अभूतपूर्व असा सत्कार करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली मिरवणूक स्टेजवर येण्यास रात्रीचे अकरा वाजले.
Dhanajay-Munde-felicitated
Dhanajay-Munde-felicitated

परळी वैजनाथ : " परळीकर जनतेने इतके अलोट प्रेम केले आहे की नुसते आभार मानून त्यांचे ऋण कधीच फिटणार नाहीत त्यामुळे त्यांच्या कायम ऋणात राहता यावे आणि आयुष्यभर त्यांची सेवा करता यावी याच माध्यमातून काम करणे म्हणजे त्यांचे खरे आभार मानणे ठरणार आहे . त्यामुळेच मला आज आभार मानण्याची संधी मिळाली नसावी," असे म्हणत धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी (ता.10) परळीतील हजारो मतदारांसमोर नतमस्तक झाले.


राज्याच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर श्री.मुंडे यांचा येथे अभूतपूर्व असा सत्कार करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली मिरवणूक स्टेजवर येण्यास रात्रीचे अकरा वाजले.


ध्वनिक्षेपकाच्या वेळेचा कायदा असल्यामुळे त्यांनी भाषण करणे टाळले आणि व्यासपीठावर नतमस्तक होत जनतेचे आभार मानले.व ध्वनिक्षेपक बंद ठेवून रात्री एक वाजेपर्यंत जमलेल्या जनसमुदाया कडून स्वागत स्वीकारले. 


माजी खासदार रजनी पाटील, पंडितराव दौंड ,आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार बाबाजानी दुर्राणी, अमरसिंह पंडित , पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, संजय दौंड, नगराध्यक्षा सरोजनी हालगे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी संयोजन समितीच्या वतीने सुवर्ण पत्र, मानचिन्ह, तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.येथे शहराच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारचा सत्कार समारंभ पार पडला. 


" पंडितअण्णा मुंडे, गोपीनाथराव मुंडे यांना जे प्रेम मायबाप जनतेने दिले तेच प्रेम परळीच्या मायबाप जनतेने मला दिले. स्वागत आणि भव्य दिव्य रॅलीमुळे मला माझ्या लोकांशी संवाद साधता आला नाही. त्यांचे ऋण व्यक्त करता आले नाही. मात्र परळीच्या एखाद्या विकासकामाच्या शुभारंभाप्रसंगी मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधणार असे धनंजय मुंडे यावेळी  म्हणाले.


 माझी नाळ ही परळीच्या मातीशी जुळलेलं आहे सामाजिक न्याय मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. सरकार म्हणून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करणारच," असा शब्द श्री.मुंडे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com