धनंजय मुंडे यांनी मागितली शाळाबाह्य मुलांची माहिती

राज्यात मागील दोन वर्षांपासून शाळाबाह्य मुलांच्या शिक्षण हक्काची विभागाकडून पायमल्ली केली जात असून त्याविरोधात मुंडे यांच्याकडे विविध संघटनांनी यावर सरकारला जाणीव करून देण्यासाठी धाव घेतली आहे.त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून याविषयीची माहिती मागितली आहे.
धनंजय मुंडे यांनी मागितली शाळाबाह्य मुलांची माहिती

मुंबई  : शाळाबाह्य मुलाच्या शिक्षण हक्कासाठी विविध स्वयंसेवी संस्थानी अनेकदा माहिती मागूनही त्यांना ती माहिती दिली जात नसल्याने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि विभागाचे सचिव नंदकुमार यांच्यावर संतापले आहेत. मागील दोन वर्षात शाळाबाह्य मुलांचे काय झाले, याची माहिती का दिली जात नाही?,  असा सवाल करत याविषयी शिक्षण मंत्र्यानी आपल्याला माहिती द्यावी अशी मागणी मुंडे यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

राज्यात मागील दोन वर्षांपासून शाळाबाह्य मुलांच्या शिक्षण हक्काची विभागाकडून पायमल्ली केली जात असून त्याविरोधात मुंडे यांच्याकडे विविध संघटनांनी यावर सरकारला जाणीव करून देण्यासाठी धाव घेतली आहे.त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून याविषयीची माहिती मागितली आहे.

दरम्यान, मागील दोन वर्षांपासून शाळाबाह्य मुलांना शिक्षण हक्‍क अधिकार मिळवून देण्यासाठी चालढकल करणाऱ्या शालेय शिक्षण विभागाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने चांगलीच खरपट्टी काढली आहे. शाळाबाह्य मुलांचे नेमके काय झाले, त्याचा अहवाल येत्या शुक्रवारपर्यंत सादर करावा असे आदेशच न्यायालयाने दिल्याने या आदेशाचे शाळाबाह्य मुलांसाठी कार्यरत असलेल्या राज्यातील सर्व संघटनांनी स्वागत केले आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या मागणीमुळे शाळाबाह्य मुलांच्या प्रश्‍नावर काम करणाऱ्या संघर्ष वाहिनी, सिस्कॉम, अवनी, समर्थन, संतुलन, शांतीवन, बांधकाम नाका कामगार आदी अनेक संघटनांना बळ मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com