dhanjay munde criticizes on chandrakantdada patil | Sarkarnama

दहा जन्म घेतले तरी पाटील यांना पवारांवर पीएच.डी. शक्‍य नाही : धनंजय मुंडे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

पुणे : दहा जन्म घेतले तरी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर तुमची पीएच.डी. पूर्ण होऊ शकणार नाही, असा टोला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता पर्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना लगावला आहे. शरद पवार यांच्यावर आपण पीएच.डी. करणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी पुण्यात पाटील यांनी म्हटले होते. त्यावर मुंडे यांनी उत्तर दिले आहे. 

शरद पवार यांच्या मनात नेमके काय असते याचा थांग लागत नाही. त्यांच्या राजकीय गुगलीने आजपर्यंत अनेकजण घायाळ झाले आहेत. या संदर्भाने पवार यांच्या राजकीय खेळीबाबत चर्चा सुरू असताना पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पवार यांच्यावर आपण आता पीएच.डी. करणार असल्याचे पाटील यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना मुंडे यांनी पाटील यांच्यावर टीका केली. पवार यांचे व्यक्तित्व खूप वेगळे आहे. त्यांना समजून घेणे चंद्रकांतदादा पाटील यांचे काम नाही. दहा जन्म घेतले तरी पाटील यांना पवार यांचा अंदाज येणार नाही, असे मुंडे यांनी यावेळी सांगितले. 

वर्ग तीनच्या पदांसाठी परीक्षा घेणाऱ्या महापोर्टल या संकेतस्थळाबाबत अनेक तक्रारी आहेत. राज्य सरकार हे पोर्टल बंद करण्याच्या विचारात आहे. मात्र, त्यास सक्षम पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय ते बंद करता येणार नाही, असे मुंडे यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख