मोदींना सांगावसं वाटत की खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया : धनंजय मुंडे

''केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सतत महागाई वाढवत सर्वसामान्यांना लुटलं. ते सतत 'मन की बात' करतात. मात्र, या मन की बातमध्ये कधी गरीबांना जगणं कठीण केलेल्या महागाईविषयी त्यांनी चकार शब्दही काढला नाही. रोजगार, नोकरी देण्याचे खोटे आमीष दाखवून त्यांनी तरुणांना फसवले. जीएसटी मुळे देश आर्थिक डबघाईला आला. विकास करण्यात अपयश आले आहे. लोकांना खायला नाही अन्‌ मोदी सहा कोटी शौचालय बांधत आहेत. त्यांना एव्हढच सांगावेसे वाटते, की खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया," अशी घणाघाती टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केली.
मोदींना सांगावसं वाटत की खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया : धनंजय मुंडे

नाशिक : ''केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सतत महागाई वाढवत सर्वसामान्यांना लुटलं. ते सतत 'मन की बात' करतात. मात्र, या मन की बातमध्ये कधी गरीबांना जगणं कठीण केलेल्या महागाईविषयी त्यांनी चकार शब्दही काढला नाही. रोजगार, नोकरी देण्याचे खोटे आमीष दाखवून त्यांनी तरुणांना फसवले. जीएसटी मुळे देश आर्थिक डबघाईला आला. विकास करण्यात अपयश आले आहे. लोकांना खायला नाही अन्‌ मोदी सहा कोटी शौचालय बांधत आहेत. त्यांना एव्हढच सांगावेसे वाटते, की खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया," अशी घणाघाती टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन रॅलीचे आज नाशिकला आगमन झाले. यानिमित्ताने सिन्नर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी मुंडे म्हणाले, "राज्यातील भाजप सरकारमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. त्याविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवत आहे. जनतेच्या प्रश्‍नांकडे सरकारने पाठ फिरवली असून केवळ आश्‍वासनांचे गाजर दाखवले जात आहे. या सरकारमधील सोळा मंत्र्यांचे नव्वद हजार कोटींचे घोटाळे मी पुराव्यानिशी विधीमंडळात मांडले. मात्र, त्यावर सरकारने काहीही कारवाई केली नाही. या सर्व मंत्र्यांचे घोटाळे झाकण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे." 

"साडे चार वर्षाच्या कारभाराने पोळून निघालेल्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्‌ भाजप सरकारला वनवासात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. याची जाणीव झाल्यावर मोदींना राम मंदिराची आठवण झाली. पण आत्ता जनतेच्या मनातुन उतरलेल्या पंतप्रधानांना निवडणुकीनंतर प्रायश्चित्त म्हणुन वनवास अटळ आहे," असेही मुंडे म्हणाले. 

यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील,माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान, प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, आमदार हेमंत टकले, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार आदी नेते व्यासपीठावर होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com