माढा येथील विजयाचे पेढे मुख्यमंत्र्यांना घरपोच पोहोचवू : धनंजय मुंडे

माढा येथील विजयाचे पेढे मुख्यमंत्र्यांना घरपोच पोहोचवू : धनंजय मुंडे

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेला उत्तर देता माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विजयाचे पेढे घरपोच पोहचविण्याचे आश्वासन दिले.

``राजकीय वादळाला हवं तसं वळवण्याची, झेलण्याची आणि परतून लावण्याची ताकद आणि धमक शरद पवार साहेबांमध्ये आहे. सलग १४ निवडणुका जिंकणाऱ्या पवार साहेबांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही. साहेब उमेदवार नसले तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माढाही जिंकू व उर्वरित महाराष्ट्रही! आमच्या विजयाचा पेढाही तुम्हाला घरपोच वर्षावर येऊन भरवू,`` अशा शब्दात मुंडे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय खासदार शरद पवार यांनी घेतला आहे त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची माघार म्हणजे युतीचा मोठा विजय आहे. राजकीय वारं ओळखून पवारांनी माघार घेतल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी युतीचा  'फुसका वारा' म्हणत टीका केली.

लोकसभेच्या 23 मे रोजीच्या निकालाने देशातल्या निकालाने तुमचे तोंड कडू पडणार आहे त्यावेळी तुम्हाला तोंड गोड करायला पेढा लागणारच आहे असल्याचा टोला लगावतांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज आनंद व्यक्त करण्यापेक्षा माढयाच्या निवडणूक रिंगणात उतरावे असे आव्हानही मुंडे यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com