dhanjay munde attack chandrakant patil about sharad pawar ph.d alligation | Sarkarnama

सात जन्म घेतले तरी पवारसाहेबांवर पीएच.डी पूर्ण होणार नाही, धनंजय मुंडेंचा चंद्रकांतदादांना टोला 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

पुणे : "" सात जन्म घेतले तरी शरद पवारसाहेबांवर पीएच. डी पूर्ण होणार नाही. साहेबांना ओळखायला दहा जन्म घ्यावे लागतील,'' असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. 

पाटील यांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्यावर पीएच.डी करावी लागेल असे म्हटले होते. पाटील यांच्या त्या टीकेचा समाचार घेताना मुंडे यांनी त्यांना टोला लगावला. ते म्हणाले, "" पवारसाहेबांवर पीएच.डी करणे सोपे नाही. त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील. भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही, हे वारंवार समोर आलंय. ते सत्तेसाठी काय काय करतात, हे जनतेला माहित आहे. भाजप अफवा पसरवत आहे.'' 

दुसऱ्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना मुंडे म्हणाले, की महापोर्टल रद्द होणारच आहे, शासन त्या विचारवर येत आहे. मात्र पर्यायी यंत्रणा द्यावी लागेल. तसेच अमरावतीजवळ काल एका महामहाविद्यालयात प्रेम विवाह न करण्याची जी शपथ घेण्यात आली आहे त्याची आम्ही चौकशी करणार आहोत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख