राजकारणाची पातळी खालावल्याने जगावे की मरावे हेच कळत नाही : धनंजय मुंडे

राजकारणाची पातळी खालावल्याने जगावे की मरावे हेच कळत नाही : धनंजय मुंडे

बीड : या निवडणुकीत माझे व माझ्या बहिणीची भाषणे सर्वांनी पाहावेत, माझ्या बहिणी मला चोर, राक्षस म्हणाल्या, परंतु मी एकही शब्द वाकडा बोललो नाही. यासह पंतप्रधान श्री मोदी व शाहांच्या सभा झाल्या तरीही वातावरणात बदल झाला नाही. यामुळे असे खालच्या पातळीचे राजकरण करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे मला जगावे का मरावे हेच कळत नसल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

धनंजय मुंडे यांनी पालक मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर खालच्या स्थरावर जाऊन टिका केल्याचा व्हिडीओ शनिवारी सर्वत्र व्हायरल झाला. यामुळे सर्वांनी या घटनाचा निषेध करत, परळीत अनेकांनी पोलीस ठाण्यात जाऊन धनंजय मुंडेवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. यासर्व प्रकरणांच्या अनुषंगाने रविवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन, हा व्हिडीओ बनावट असल्याचा स्पष्ट खुलासा केला. गुरुवारी मी भाषण केले, तेच भाषण निवडणूकीच्या शेवटच्या दिवशी बदल करुन व्हायरल करण्यात आले. मोदी व शाहांच्या भाषणांने काहीच फरक पडला नाही. यामुळे असे घाणरडे राजकारण केले. बहिण भावांच्या नात्यात असे विष कालवण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. त्या सर्वांना आता जनताच त्यांची जागा दाखवेल. परंतु या सर्व प्रकरणामुळे मला सध्या जगावे का मरावे हेच कळत नाही असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदे मध्ये व्यक्त केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com