झेडपीतील रिक्त पदे भरताना बेरोजगारांची लूट : धनंजय मुंडे यांचा आरोप 

झेडपीतील रिक्त पदे भरताना बेरोजगारांची लूट : धनंजय मुंडे यांचा आरोप 

मुंबई : राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील रिक्त पदे भरण्यासाठी सुरू केलेल्या पद भरतीसाठी खुल्या वर्गातील उमेदवारांकडून 17 हजार रुपयांची शुल्क वसुली करून बेरोजगार तरुणांची लूट केली जात आहे. महापोर्टलचा हा महाभ्रष्टाचार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

हे शुल्क कमी करण्याबाबत ग्रामीण राज्यमंत्री दादा भुसे ठोस आश्वासन देऊ न शकल्याने तालिका सभापती रामराव वडकुते यांनी ही लक्षवेधी राखून ठेवत मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले. यादरम्यान बेरोजगारांची लूट करणाऱ्या महापोर्टल आणि सरकारचा निषेध करत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. 

या संदर्भात विधान परिषदेत आज हेमंत टकले यांनी लक्षवेधीमार्फत हा मुद्दा उपस्थित करताना 34 जिल्हा परिषदांमध्ये एकाच पदासाठी 34 प्राधान्यक्रम द्यायचे असल्यास, त्या उमेदवाराला 17 हजार रुपये भरावे लागतात, ते सुशिक्षित बेरोजगारांना शक्‍य नसल्याने ते कमी करावेत, अशी मागणी केली. त्यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी सरकार 11 लाख विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 500 रुपये घेऊन "महापोर्टल'ला 60 कोटी रुपये देत असल्याचा आरोप केला. ही भरती बेरोजगारांसाठी आहे का? त्यांची लूट करून महापोर्टलची भरती करण्यासाठी आहे? असा सवाल उपस्थित केला.

हे शुल्क 100 रुपये व 50 रुपये करण्याबाबत त्यांनी आग्रह कायम ठेवल्याने या विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भुसे यांनी दिला. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे किमान 100 ते जास्तीत जास्त 500 रुपये इतकेच शुल्क आकारले जावे; अन्यथा जिल्हा परिषदेच्या या नोकरभरतीमध्ये शहरी मुलांनाच नोकऱ्या मिळतील. ग्रामीण भागातील तरुणांना याचा लाभ मिळणार नसल्याची शंका मुंडे यांनी व्यक्त केली. 

या लक्षवेधीला उत्तर देताना यांनी शुल्क कमी करण्यासंदर्भात ठोस आश्वासन न दिल्याने व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे तालिका सभापती रामराव वडकुते यांनी ही लक्षवेधी राखून ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच या संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत सर्व सदस्यांची बैठक घेऊन शुल्क कमी करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचेही ठरले. सुशिक्षित बेरोजगारांची लूट करणाऱ्या महापोर्टल आणि सरकारचा निषेध करत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com