dhangar reservation agitation in beed district | Sarkarnama

बीड जिल्ह्यात मेंढ्यांसह भंडारा उधळत धनगर समाज रस्त्यावर 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

बीड : धनजगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने झाली. धारुर, अंबाजोगाई व माजलगावात बंद पाळण्यात आला. त्यामुळे व्यापारपेठ ठप्प होती. तर, अनेक ठिकाणी चक्काजाम, रास्ता रोको, धरणे आंदोलन करण्यात आले.

मेंढ्यांसह हाती पिवळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलेल्या समाजबांधवांनी येळकोट - येळकोट जयमल्हार असा घोष करत भंडाऱ्याची उधळण करत आरक्षण मागणीच्या घोषणा दिल्या. 

माजलगावध्ये फेरी काढून महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. तर, सिरसाळा येथेही राज्यमार्ग रोखण्यात आला. आष्टी येथेही समाजबांधवांनी रास्ता रोको केला. अंबाजोगाईत दुचाकी फेरी काढून बसस्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

बीडमध्ये रास्ता रोको आणि धरणे आंदोलन करण्यात आले. केजमध्ये समाजबांधव पिवळे झेंडे हाती घेऊन मेंढ्यांसह आंदोलनात सहभागी झाले. भंडाऱ्याची उधळण करत येळकोट - येळकोट जयमल्हारचा घोष करण्यात आला. बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. आरक्षण मागणीच्या घोषणांनी परिसर दणानून गेला. 

दरम्यान, माजलगाव, अंबाजोगाईत व धारुरमध्ये बंद पाळण्यात आला. केजमध्ये मेंढ्यांसह रस्त्यावर हाती पिवळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलेल्या समाजबांधवांनी ढोल बडवत येळकोट येळकोट जयमल्हारचा घोष केला. आरक्षण मागणीच्या घोषणांनी परिसर दणानून गेला. विविध ठिकाणी चक्काजाम, रास्ता रोको आंदोलने झाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख