dhangar reseravtion agitation | Sarkarnama

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी काळ्या गुढ्या

राजकुमार थोरात
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

वालचंदनगर :  धनगर समाजाला अनुसूचित जमाती(एसटी) चे आरक्षण मिळावे यासाठी  बोरी (ता.इंदापूर) येथील ग्रामस्थांनी काळ्या गुढ्या उभारुन सरकारचा निषेध केला. तसेच मेगाभरती थांबविण्याची मागणी केली.

वालचंदनगर :  धनगर समाजाला अनुसूचित जमाती(एसटी) चे आरक्षण मिळावे यासाठी  बोरी (ता.इंदापूर) येथील ग्रामस्थांनी काळ्या गुढ्या उभारुन सरकारचा निषेध केला. तसेच मेगाभरती थांबविण्याची मागणी केली.

धनगर समाजाच्या आरक्षणावरुन सरकारला कोंडीत पकण्यासाठी ग्रामीण भागातून आंदोलनास सुरवात होऊ लागली आहे.  धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी  राज्यातील धनगर समाजाने आरक्षणासाठी १२ ते १९ डिसेंबरपर्यंत घरावर काळे झेंडे लावून सरकाराचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला आज गुरुवार पासुन इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील  धनगर समाजातील नागरिकांनी प्रतिसाद दिला.

गावातील बहुतांश नागरिकांनी घरावरती काळे गुढ्या उभारुन  निषेध केला. तसेच वाड्यावस्त्यावरील नागरिकांनी घरावती काळ्या गुढ्या उभारल्या होत्या. १९ डिसेंबर पर्यंत बोरी परीसरातील नागरिक घरावर काळे गुढ्या उभारणार लावून निषेध करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र जोरी यांनी दिली. यावेळी छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सरपंच गणेश नागवे,पोपट ठोंबरे, सुभाष शिंदे, सोमनाथ ठोंबरे, दत्तात्रेय शिंदे उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख