महाजनादेश यात्रा बारामतीत आल्यास त्यात मेंढ्या घुसविणार

महाजनादेश यात्रा बारामतीत आल्यास त्यात मेंढ्या घुसविणार

बारामती शहर : भारतीय जनता पक्षाची महाजनादेश ज्या दिवशी बारामतीत येईल त्या दिवशी या यात्रेत मेंढ्या घुसवून निषेध केला जाईल, असा इशारा धनगर आरक्षण युवा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. आज या बाबतचे निवेदन उपविभागीय अधिका-यांना दिले गेले. 

स्वताः मुख्यमंत्र्यांनीच बारामतीत धनगर बांधवांना आरक्षणाचा शब्द दिला होता. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असे जाहिर केले होते आता पाच वर्षे उलटूनही आरक्षण मिळालेले नाही, पाच वर्षात मंत्रीमंडळाच्या 240 बैठका होऊनही अद्याप धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही. योजना नको एसटीचे सर्टीफिकेट द्या, अशी मागणी या समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

एसटीचे आरक्षण मिळाले की सर्व सवलती आपोआपच मिळतील, असेही निवेदनात नमूद केले आहे. स्वताः देवेंद्र फडणवीस यांनीच बारामतीत येत आरक्षणाचा शब्द देत आंदोलन संपविले होते, मात्र पाच वर्षात त्यांनी काहीही केले नाही, असा आरोप करण्यात आला.

बारामतीत येताना तुमच्या पक्षातील भाजपच्या एखाद्या धनगर समाजातील पदाधिकाऱ्यांचे एसटी चे सर्टिफिकेट आपण दिलेल्या शब्दा प्रमाणे घेऊन आला नाही तर आम्ही आपल्या महजनादेश यात्रेत शेळ्या मेंढ्यांसह निषेध आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. 

या निवेदनावर बापूराव सोलनकर, गणपत देवकाते, अविनाश भिसे, माणिक काळे, तानाजी कोळेकर, सुरज खोमणे, तुषार कोकरे, सचिन सोलनकर, विजय गावडे, संग्राम झारगड, पंकज देवकाते, आबा टकले, अरविंद देवकाते, महेश गावडे, दिलीप नाळे, साधू बल्लाळ, रणजित वाघ,  यांच्या सह्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com