दत्तात्रय भरणे, प्रकाश शेंडेगेंना मंत्री करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे आणि शिवसेनेने प्रकाश शेंडगे यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने केली आहे.
दत्तात्रय भरणे, प्रकाश शेंडेगेंना मंत्री करण्याची मागणी

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे आणि शिवसेनेने प्रकाश शेंडगे यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने केली आहे.

धनगर समाजातील नेते उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत 'दत्तामामा भरणे यांना मंत्रीपद द्यावे' अशी मागणी पवार यांच्याकडे केली आहे.

माळेगाव येथील मेळाव्यात शिवसेनेने प्रकाश शेंडगे यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे. प्रकाश शेंडगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेनेचा प्रचार केला होता. शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद मिळावे अशी त्यांची इच्छा आहे. 

भाजपच्या काळात धनगर समाजाला दोन मंत्रीपदे मिळाली होती. या महाआघाडीच्या सरकारने सुद्धा योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी धनगर समाजाचे नेते करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com